Join us

"आता मला लवकर लग्न करायचंय; ३ मुलांना जन्म द्यायचाय, जर दोन वर्षांत मुलगा..."

By ऑनलाइन लोकमत | Published: December 04, 2024 1:40 PM

1 / 11
अभिनेत्री जिया शंकर हिने अनेकदा आपल्या रिलेशनशिपबद्दल मोकळेपणाने संवाद साधला आहे. ती कोणत्या प्रसंगातून गेली आहे हे सांगितलं आहे.
2 / 11
जियाने सांगितलं होतं की, ती एका अशा रिलेशनशिपमध्ये होती जिथे तिला खूप त्रास सहन करावा लागला होता.
3 / 11
ब्रेकअपनंतर तिच्या मनात खूप भीती निर्माण झाली होती असं अभिनेत्रीने म्हटलं आहे.
4 / 11
'ब्रेकअपनंतर आता मी कोणावरच विश्वास ठेवू शकत नाही. माझा विश्वास पूर्णपणे तुटला आहे.'
5 / 11
'लोकांनी माझा खूप फायदा घेतला आहे. त्यामुळे आता कोणावरही विश्वास ठेवणं खूप कठीण आहे.'
6 / 11
'खूप जास्त विचार करून मी एखाद्यावर विश्वास ठेवेन. मला आयुष्यात कोणतंही रिग्रेट ठेवायचं नाही.'
7 / 11
'मी टॉक्सिक रिलेशनशिपमध्ये होते. त्यामुळे मी पूर्णपणे खचून गेली. याच दरम्यान मी स्वत:ला हरवून बसली होती' असं जियाने म्हटलं आहे.
8 / 11
अभिनेत्रीने आता आपल्या लग्नाबद्दल भाष्य केलं आहे. ती ३० वर्षांची झाली असून आता तिला लवकरात लवकर लग्न करायचं आहे.
9 / 11
'मला लवकर लग्न करायचं आहे. तीन मुलांना जन्म द्यायचा आहे. जर दोन वर्षांत मुलगा मिळाला नाही तर मी अरेंज मॅरेज करेन' असं जियाने म्हटलं.
10 / 11
जिया शंकरने आपल्या अभिनयाने स्वत:ची एक वेगळी ओळख निर्माण केली आहे. तिचे असंख्य चाहते आहेत. ती नेहमीच तिचे ग्लॅमरस फोटो शेअर करत असते.
11 / 11
टॅग्स :बॉलिवूड