Join us

किस्सा : लव्हमेकिंग सीनवेळी जॉनकडून झाली होती मोठी गडबड, कंगनाला झाली होती जखम

By ऑनलाइन लोकमत | Published: December 18, 2021 4:12 PM

1 / 7
जॉन अब्राहम (John Abraham) आणि कंगना रणौत (Kangana Ranaut) आज बॉलिवूडच्या सर्वात चांगल्या कलाकारांपैकी एक आहेत. मॉ़डलिंगमधून आपल्या करिअरला सुरूवात करणाऱ्या जॉनने अनेक म्युझिक व्हिडीओजमध्ये काम केलं. जॉन करिअरच्या सुरूवातीला जिस्म आणि सायासारख्या बोल्ड सिनेमातही काम केलं होतं. या सिनेमात त्याच्यासोबत त्याची एक्स बिपाशा बसू होती. त्याने अनेक सिनेमात इंटेन्स आणि इंटीमेट सीन्स दिले होते.
2 / 7
जॉन आणि कंगनाने एकता कपूरच्या 'शूट आउट अॅट वडाला' मध्ये सोबत काम केलं होतं. या सिनेमातील एका गाण्याच्या शूटवेळी जॉन कंगनासोबत इतका अग्रेसिव्ह झाला होता की, कंगनाचं रक्त निघालं होतं. कंगनासोबत एक लव्हमेकिंग सीन करतान जॉन अब्राहम आपल्या भूमिका चांगलाच शिरला होता. जॉनला त्यावेळी अंदाज आला नाही की, त्याच्यामुळे कंगनाला जखम लागेल आणि तिचं रक्त निघेल.
3 / 7
जॉनने कंगनासोबत या सिनेमासाठी दोन रोमॅंटिक गाणी रेकॉर्ड केली होती. ज्यातील एका गाण्यात तर दोघांमध्ये खूप किसींग सीन होते. तर दुसऱ्या गाण्यात त्यांना अग्रेसिव्ह व्हायचं होतं आणि कंगनासोबत काही इंटिमेट सीन्स शूट करायचे होते.
4 / 7
जेव्हा गाणं रिलीज झालं तेव्हा दोघांच्या केमिस्ट्रीचं कौतुक करण्यात आलं. पण जॉन कंगनासोबत इंटिमेस सीन करताना इतका भूमिकेत शिरला होता की, त्याने कंगनाचा हात जोरात पकडला.
5 / 7
'ये जुनून' या गाण्यात कंगना साडी नेसून होती. मीडिया रिपोर्ट्सनुसार, या गाण्याच्या शूटींग वेळ जॉन इतका भूमिकेत शिरला होता की, कंगनाचा हात त्याने जोरात पकडला आणि तिच्या हातातील काचेच्या बांगड्या फुटल्या. ज्यामुळे तिला जखम झाली होती आणि तिच्या हातातून रक्त येत होतं.
6 / 7
जॉनला जेव्हा हे समजलं तेव्हा त्याने लगेच कंगनाची माफीही मागितली. तिथे उपस्थित लोकांना हे समजून आलं की, दोघे त्यांचा सीन करण्यात इतके रमले होते ज्यामुळे ही घटना घडली. कंगना खूप प्रोफेशनल अभिनेत्री आहे त्यामुळे तिला याचं वाईट वाटलं नाही आणि गाण्याचं शूटींग पुढेही चांगलं झालं.
7 / 7
२०१३ मध्ये रिलीज झालेल्या 'शूट आउट अॅट वडाला' ने मोठ्या पडद्यावर जास्त कमाल दाखवला नव्हता. पण या सिनेमातील दोघांची जोडी लोकांना आवडली होती. या सिनेमात कंगना आणि जॉनशिवाय मनोज वायपेयी, सोनू सूद, तुषार कपूर आणि अनिल कपूर यांच्याही भूमिका होत्या.
टॅग्स :जॉन अब्राहमकंगना राणौत