जॉन अब्राहम (John Abraham) आणि बिपाशा बसू(Bipasha Basu) यांच्या अफेअरची इंडस्ट्रीत सर्वाधिक चर्चा झाली होती. ऑनस्क्रीन आपल्या रोमँटीक केमिस्ट्रीने रसिकांची पसंती मिळवल्यानंतर खऱ्या आयुष्यातही दोघांची केमिस्ट्री जबरदस्त होती. मात्र काही कारणामुळे दोघांचे नाते फार काळ काही टिकू शकले नाही. दोघांचे ब्रेकअप झाल्यानंतर दोघांनी वेगवेगळ्या व्यक्तीसोबत संसार थाटत आयुष्याची नवीन सुरुवात केली होती.