Jr NTRच्या लग्नात नवरीची साडीच होती 1 कोटींची, लग्नाचा खर्च ऐकून फुटेल तु्म्हाला घाम By ऑनलाइन लोकमत | Published: May 05, 2022 11:02 AM1 / 8 साऊथचा अभिनेता ज्युनियर एनटीआर आज सुपरस्टार आहे. तिचे जगभरात फॅन फॉलोईंग आहे. बॉलिवूडच्या अनेक अभिनेत्यांना तो टक्कर देतो. चाहत्यांना त्याच्या पर्सनल लाईफबाबात जाणून घेण्याची इच्छा आहे. आज न्युनिअर एनटीआर आणि त्याची पत्नी लक्ष्मी प्रणतीच्या लग्नाचा वाढदिवस आहे. त्यानिमित्त जाणून घेऊया त्याच्या आयुष्यासंबंधीत इंटरेस्टिंग गोष्टी..(Photo Instagram) 2 / 8ज्युनियर एनटीआरने २०११ मध्ये लक्ष्मी प्रणतीशी विवाह केला आणि त्यांचा विवाह दक्षिण भारतीय चित्रपटसृष्टीतील सर्वात महागडा विवाह मानला जातो. ज्युनिर एनटीआरची पत्नी त्याच्यापेक्षा 10 वर्षांनी लहानआहे. ज्युनियर एनटीआर हा प्रसिद्ध अभिनेते आणि आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री एनटी रामाराव यांचा नातू आहे. जुनिअर एनटीआरची पत्नी लक्ष्मी ही उद्योगपती श्रीनिवास राव यांची मुलगी आणि तेलुगू न्यूज चॅनल 'स्टुडिओ एन' ची मालक आहे..(Photo Instagram) 3 / 8ज्युनियर एनटीआरने २०११ मध्ये लक्ष्मी प्रणतीशी विवाह केला आणि त्यांचा विवाह दक्षिण भारतीय चित्रपटसृष्टीतील सर्वात महागडा विवाह मानला जातो. ज्युनियर एनटीआर हा प्रसिद्ध अभिनेते आणि आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री एनटी रामाराव यांचा नातू आहे. जुनिअर एनटीआरची पत्नी लक्ष्मी ही उद्योगपती श्रीनिवास राव यांची मुलगी आणि तेलुगू न्यूज चॅनल 'स्टुडिओ एन' ची मालक आहे. (Photo Instagram) 4 / 8 तुम्हाला हे जाणून आश्चर्य वाटेल की, लग्नाआधीही ज्युनियर एनटीआरवर गुन्हा दाखल झाला होता. त्याला २०१० मध्येच लक्ष्मीसोबत विवाह करायचा होता, परंतु त्यावेळी तिचं वय केवळ १७ वर्ष होते, त्यामुळे वकिलाने ज्युनियर एनटीआर विरोधात 'बालविवाह कायद्या'चा खटला दाखल केला होता. अखेर १ वर्षाच्या प्रतीक्षेनंतर दोघांनी विवाह केला.(Photo Instagram) 5 / 8काही रिपोर्ट्सनुसार, त्यांच्या लग्नात पाण्यासारखा पैसा खर्च करण्यात आला. जवळपास १०० कोटी रुपयांचा खर्च करण्यात आला होते आणि 18 कोटी रुपये फक्त मंडप सजवण्यासाठी खर्च करण्यात आले होते. तसेच 15 हजार पाहुणे सहभागी झाले होते.(Photo Instagram) 6 / 8आता अभय राम आणि भार्गव राम नावाची दोन मुलंही आहेत. ज्युनियर एनटीआरचे त्याच्या कुटुंबावर अतिशय प्रेम आहे.(Photo Instagram) 7 / 8त्यांचा विवाहाचं प्रक्षेपणही दक्षिणेच्या प्रादेशिक वाहिनीवर करण्यात आलं होतं. मीडिया रिपोर्ट्सनुसार, जूनियर एनटीआरची पत्नी लक्ष्मीनं विवाहाच्या वेळी १ कोटी रुपयांची साडी नेसली होती..(Photo Instagram) 8 / 8 आणखी वाचा Subscribe to Notifications