जुही चावलाने लपवून ठेवली होती जय मेहतासोबतच्या लग्नाची गोष्ट,कारण वाचून व्हाल हैरान By ऑनलाइन लोकमत | Published: February 9, 2021 01:56 PM 2021-02-09T13:56:17+5:30 2021-02-09T14:02:10+5:30
बॉलिवूडमध्ये अनेक अभिनेते-अभिनेत्री आहेत, ज्यांनी आपले नाते आणि लग्न सर्वांपासून लपून ठेवले. असेच काहीसे चुलबुली गर्ल म्हणून ओळखली जाणारी जुही चावलानेही केले होते. जुहीने नव्वदीच्या दशकात अनेक हिट सिनेमे दिले आहेत.अल्पावधीतच तिने आपले स्थान निर्माण केले होते.
जूही चावलाने अल्पावधीतच रसिकांची पसंती मिळवली होती. अभिनयाप्रमाणेच प्रत्येकजण तिचे सौंदर्य पाहून तिच्यावर फिदा व्हायचा.
जूही चावलाने अनेक सुपरस्टार्ससह सिनेमांमध्ये काम केले आहे आणि बर्याच अभिनेतेही तिच्यासाठी वेडेही होते.
1997 मध्ये जुही चावलाने बिझनेसमन जय मेहतासोबत गुपचूप लग्न केले.जुही जय यांची दुसरी पत्नी आहे. त्यांना दोन मुलंही आहेत.
मात्र तिने लग्न झाल्याचे समोर येऊच दिले नाही. त्यावेळी मीडियाचाही इतका गाजावाज नव्हता, त्यामुळे जगापासून आपले नाते लवपणेही शक्य गेले.
लग्नानंतर अभिनेत्रींची लोकप्रियका कमी होते अशी समज त्यावेळी होती, करियर चालू ठेवायचे होते. म्हणून लग्न झाल्याचे लवपून ठेवल्याचे खुद्द जुहीनेच सांगितले होते.
मात्र जुहीच्या लग्नाची पोलखोल जेव्हा झाली तेव्हा ती पहिल्यांदा प्रेग्नेंट झाली, तेव्हा तिने सा-यांसमोर लग्न केल्याचे कबूल केले होते.
जुहीने स्वत:कबूल केले होते, की लग्नानंतर करिअरची चिंता होती. म्हणून तिने लग्नाची गोष्ट लपून ठेवली होती.
जुहीच्या सिक्रेट वेडिंगमध्ये फक्त जवळचे मित्र आणि कुटुंबातील सदस्यच सहभागी झाले होते.