एका नकाराने बर्बाद झालं जुहीचं करिअर, कारण ठरली माधुरी! तरी करिष्मालाच कसा झाला फायदा By ऑनलाइन लोकमत | Published: January 17, 2024 1:55 PM1 / 8भारतीय सिनेमाच्या इतिहासात 90 चा काळ फारच रंजक होता. एकापेक्षा एक चित्रपट 90च्या दशकात रिलीज झाले. तसंच माधुरी, जुही, रवीना, करिश्मा या उत्कृष्ट अभिनेत्रीही हिंदी सिनेसृष्टीला मिळाल्या.2 / 8९० च्या दशकात जूही चावला, रवीना टंडन, करिश्मा कपूर, माधुरी दीक्षित या अभिनेत्रींचा बोलबाला होता. सर्व अभिनेत्रींनी अभिनेत्यांच्या तोडीस तोड काम केलं. मात्र जुहीच्या एका निर्णयाने तिच्या हातातून मोठा हिट सिनेमा गेला.3 / 81997 साली यश चोप्रा यांचा 'दिल तो पागल है' सिनेमा रिलीज झाला होता. लव्हट्रँगलवर आधारित या सिनेमात शाहरुख खानची मुख्य भूमिका होती. तर माधुरी आणि करिश्मा कपूर या दोन अभिनेत्री होत्या. बॉक्सऑफिसवर सिनेमा ब्लॉकबस्टर हिट ठरला. 4 / 8सिनेमासंबंधित नंतर अशी माहिती आली की करिश्मा कपूरच्या जागी मेकर्सने जूही चावलाला सर्वात आधी भूमिका ऑफर केली होती. मात्र जूहीने सिनेमा करण्यास नकार दिला. याचं कारण म्हणजे सिनेमात माधुरी लीड रोलमध्ये होती.5 / 8जूही तेव्हाची आघाडीची अभिनेत्री असल्याने तिला सिनेमात साईड रोल करायचा नव्हता. म्हणून जूहीने ऑफर नाकारली. पण जूहीला हे कळलं नाही की तिच्या या निर्णयाचा तिच्या करिअरवर मोठा परिणाम होणार आहे. 6 / 8'दिल तो पागल है' नंतर जूहीचे सर्वच चित्रपट आपटले. यामध्ये 'सात रंग के सपने','डुप्लीकेट' सारख्या सिनेमांचा समावेश आहे. यामुळे जूहीच्या करिअरला उतरती कळा लागली. तर दुसरीकडे 'दिल तो पागल है' सुपरडुपर हिट झाला.7 / 8जुहीच्या नकाराने माधुरीला मात्र फायदा झाला नाही. कारण 'दिल तो पागल है'मध्ये माधुरीवर करिश्मा कपूरच भारी पडली. करिश्माच्या नृत्याचं आणि अभिनयाचं माधुरीपेक्षाही जास्त कौतुक झालं. सिनेमात लीड हिरोईनपेक्षा साईड हिरोईनलाच जास्त भाव मिळाला. 8 / 8करिश्माचं यानंतर नशीबच फळफळलं. तिने नंतर 'बीवी नंबर 1','हसीना मान जाएगी','हम साथ साथ है' असे सुपरहिट चित्रपट दिले. करिश्माला प्रेक्षकांनी अक्षरश: डोक्यावर उचललं. तर जुही मात्र गायब झाली. आणखी वाचा Subscribe to Notifications