Join us

इतकी वर्ष कुठं गायब झाली होती ‘कभी खुशी कभी गम’ची ‘पू’? वाचा कारण

By ऑनलाइन लोकमत | Published: June 27, 2021 6:02 PM

1 / 8
करण जोहरच्या ‘कभी खुशी कभी गम’ या 2001 मध्ये प्रदर्शित झालेल्या चित्रपटात करिना कपूरच्या बालपणीची भूमिका साकारणारी ‘पू’ तुम्हाला आठवतेय का? मालविका राज असं नाव असलेल्या अभिनेत्रीने ही भूमिका साकारली होती.
2 / 8
पहिल्याच सिनेमात मालविकाला करिना कपूरच्या बालपणीची भूमिका साकारण्याची संधी मिळाली होती. तेव्हा ती 11 वर्षांची होती.
3 / 8
ही चिमुकली एक दिवस लोकप्रिय अभिनेत्री होईल, अशी भविष्यवाणी खुद्द करण जोहरने केली होती. परंतु दुर्दैवाने अद्याप तरी ही भविष्यवाणी खोटी ठरली आहे.
4 / 8
कभी खुशी गम या सिनेमानंतर मालविकाने बॉलिवूडमध्ये काम केलंच नाही. कारण तिने अभिनयाऐवजी अभ्यासावर लक्ष द्यावं, अशी तिच्या आईवडिलांची इच्छा होती.
5 / 8
मालविकानं हिंदुस्तान टाईम्सला दिलेल्या मुलाखतीत आपल्या करिअरवर भाष्य केले. करिअर सुरु झालं तेव्हा मी केवळ 11 वर्षांचे होते. त्यामुळं मी केवळ अभ्यासावर लक्ष केंद्रित करावं अशी माझ्या आई-वडिलांची इच्छा होती. त्यांच्या इच्छेखातर मी बॉलिवूडपासून दूर राहण्याचा निर्णय घेतला होता, असं तिनं सांगितलं.
6 / 8
आता मात्र मालविका अभिनयात सेकंड इनिंग सुरू करतेय. डॅनी डेन्जोंग्पाचा मुलगा रिंजिंग याच्यासोबत मालविका ‘स्क्वॉड’ या सिनेमात झळकणार आहे.
7 / 8
30 वर्षांची मालविका सध्या मॉडेलिंग करतेय. 2010 मध्ये तिने फेमिना मिस इंडिया या सौंदर्य स्पर्धेत भाग घेतला होता.
8 / 8
2017 साली ती एका तेलगू सिनेमात झळकली होती. आता ती बॉलिवूडमध्ये झळकणार आहे.
टॅग्स :मालविका राज