Kabir Bedi : चौथ्या पत्नीसोबत रोमॅंटिक झाले कबीर बेदी, मुलीपेक्षा ४ वर्षांनी लहान आहे पत्नी By ऑनलाइन लोकमत | Published: January 29, 2023 11:29 AM1 / 10बॉलिवुड अभिनेते कबीर बेदी त्यांच्या चौथ्या पत्नीसह नुकतेच एका अवॉर्ड सोहळ्यासाठी आले होते. या जोडीला पाहून पुन्हा चर्चेला उधाण आले. कारण कबूर बेदी यांची परवीन दुसांज चौथी पत्नी आहे.2 / 10कबीर बेदी हे ७०-८० च्या काळातील आघाडीचे अभिनेते.मात्र गेल्या काही काळापासून ते त्यांच्या लग्न आणि घटस्फोटांमुळेच चर्चेत आहेत. आजही ते सार्वजनिक कार्यक्रमात स्पॉट झाले की चर्चांना उधाण येते.3 / 10कबीर यांच्या चौथ्या लग्नाला ७ वर्ष झाली आहेत. शनिवारी हे कपल स्टारडस्ट अवॉर्डमध्ये दाखल झाले. यावेळी पापाराझींनी त्यांना कॅमेऱ्यात कैद केले. कबीर यांनीही पत्नीसोबत रोमॅंटिक पोज दिल्या.4 / 10पत्नीला मिठीत घेत तर कघी कमरेवर हात ठेवत त्यांनी फोटो काढले. ७७ व्या वर्षीही त्यांचा हा चार्म बघून सगळेच अवाक झालेत. ब्लॅक सूटमध्ये त्यांचा डॅशिंग लुक दिसला. तर त्यांची पत्नी परवीन पिवळ्या रंगाच्या ड्रेसमध्ये सुंदर दिसत होती.5 / 10कबीर यांनी वयाच्या ७० व्या वर्षी चौथे लग्न केले. तेव्हा त्यांची बायको ४१ वर्षांची होती. वयामध्ये एवढे अंतर असूनही त्यांनी सात फेरे घेतले. 6 / 10मात्र या नात्यात सर्वात लक्ष वेधून घेणारी एक बाब म्हणजे त्यांच्या चौथ्या पत्नीचे वय हे कबीर बेदी यांच्या मुलीपेक्षाही कमी आहे. त्यांची लेक आणि अभिनेत्री पूजा बेदी ही परवीन दुसांज यांच्यापेक्षा ४ वर्षांनी मोठी आहे.7 / 10कबीर बेदी यांचे पहिले लग्न प्रोतिमा बेदी यांच्याशी १९६९ मध्ये झाले होते. त्यांना पूजा आणि सिद्धार्थ दोन मुलं झाली. मात्र काहीच वर्षात त्यांचा घटस्फोट झाला. 8 / 10यानंतर ब्रिटिश फॅशन डिझायनर सुझैन हम्फ्रेस हिच्याशी त्यांचा दुसरा विवाह झाला. दोघांना अॅडम हा मुलगा झाला. मात्र हे लग्नही टिकू शकले नाही.9 / 10१९९० साली त्यांनी तिसऱ्यांदा लग्नगाठ बांधली. टीव्ही आणि रेडिओ प्रेझेंटर निक्कीसह त्यांनी विवाह केला. २००५ मध्ये मात्र त्यांचा घटस्फोट झाला. 10 / 10चार लग्नांशिवाय कबीर यांचे परवीन बाबी यांच्यासोबतचे अफेअरही चर्चेत होते. दोघेही एकमेकांच्या प्रेमात होते.कबीर यांच्यासोबत परवीन बाबी यांनी हॉलिवुडची सुद्धा सफर केली. मात्र त्यांच्यातील नाते फार काळ टिकू शकले नाही. आणखी वाचा Subscribe to Notifications