-म्हणून काजल अग्रवालने कोरोना महामारीच्या काळात उरकले लग्न By रूपाली मुधोळकर | Published: November 03, 2020 11:12 AM1 / 11अभिनेत्री काजल अग्रवाल 30 ऑक्टोबरला लग्नाच्या बेडीत अडकली. मित्र गौतम गौतम किचलूसोबत तिने लग्नगाठ बांधली. कोरोना काळात काजल व गौतमने लग्न करण्याचा निर्णय घेतला, पण का?2 / 11कोरोना महामारीच्या काळात लग्नगाठ बांधण्याचा निर्णय का घेतला? याचे उत्तर खुद्द काजलने दिले आहे.3 / 11वोग मॅगझिनला दिलेल्या मुलाखतीत ती लग्नाबद्दल बोलली. ती म्हणाली, मी आणि गौतमने तीन वर्षे एकमेकांना डेट केले. सात वर्षे आम्ही मित्र बनून राहिलो. मैत्री असो वा डेट आमचे नाते आणखी बळकट होत गेले.4 / 11तिने सांगितले, आम्ही दोघेही एकमेकांना भेटायचो. इव्हेंट माझ्या घरचा असो वा त्याच्या घरचा. प्रत्येकवेळी आम्ही भेटायचो. मात्र गेल्या काही महिन्यांपूर्वी लॉकडाऊनमध्ये आमच्या भेटीगाठी थांबल्या.5 / 11पुढे ती म्हणाली, काही आठवडे आम्ही एकमेकांना भेटू शकलो नाही. हा विरह इतका असह्य झाला की, एकमेकांना पाहण्यासाठी आम्ही ग्रॉसरी स्टोरमध्ये मास्क लावून भेटलो. आता एकमेकांपासून दूर राहणे कठीण आहे, हे त्याक्षणी आम्हाला जाणवले आणि आम्ही लग्नाचा निर्णय घेतला.6 / 11गौतमने कसे प्रपोज केले याबद्दल तिने सांगितले, गौतम फिल्मी टाईप व्यक्ति नाही. त्याने अगदी साधेपणाने मला प्रपोज केले. तो इतका प्रामाणिक होता की, त्याने भावना व्यक्त करताच मी त्याला होका दिला.7 / 11काजल व गौतम अनेक वर्षांपासून एकमेकांना डेट करत होते. पण या रिलेशनशिपबद्दल कोणालाही काहीही ठाऊक नव्हते. त्यांनी आपले नाते जगापासून शेवटपर्यंत लपवून ठेवले. मात्र गौतम व काजलच्या लग्नाची जोरदार चर्चा झाली.8 / 11 कुटुंब आणि मित्रपरिवाराच्या उपस्थितीत त्यांचा विवाहसोहळा पार पडला. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर अगदी मोजके पाहुणे या लग्नाला हजर होते. काजल आणि गौतमच्या लग्नाचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले होते. 9 / 11काजलचा नवरा गौतम किचलूचा इंटीरिअरचा व्यवसाय आहे. दस-याच्या मुहूर्तावर गौतम किचलूशी आपण लग्न करत असल्याची बातमी काजलने आपल्या चाहत्यांना दिली होती. 10 / 11 काजल अग्रवालने अनेक दाक्षिणात्य सिनेमांमध्ये मुख्य अभिनेत्रीच्या भूमिका साकारल्या आहेत. हिंदी सिनेमातही तिने काम केले आहे. 11 / 11 अजय देवगणसोबत सिंघम या चित्रपटामध्येही ती दिसली होती. त्यानंतर अक्षय कुमारसोबत स्पेशल 26 सिनेमातही तिने काम केले. आणखी वाचा Subscribe to Notifications