Join us

PHOTOS : 22-23 वर्षात कुणी किती बदलू शकतं? काजोलच्या ‘मंगेतर’चे फोटो पाहून व्हाल थक्क

By ऑनलाइन लोकमत | Published: March 23, 2021 8:00 AM

1 / 10
22-23 वर्षात कुणी किती बदलू शकतं? तर ओळखताही येऊ नये इतकं. होय, अभिनेता बिजय जे आनंदचे फोटो पाहिल्यानंतर तुम्हीही हेच म्हणाल.
2 / 10
1998 साली आलेला ‘प्यार तो होना ही था’ हा सिनेमा तुम्हाला आठवत असेलच आणि या सिनेमातील काजोलचा ‘मंगेतर’ही आठवत असणार. हाच तो बिजय जे आनंद.
3 / 10
‘प्यार तो होना ही था’ या सिनेमात बिजय काजोलसोबत स्क्रिन शेअर करताना दिसला होता. हाच हँडसम बिजय आज एखाद्या योगगुरूसारखा दिसतो.
4 / 10
‘प्यार तो होना ही था’ या सिनेमानंतर बिजय आनंदला अनेक चित्रपटाच्या ऑफर्स आल्यात. पण त्याने फार कमी सिनेमात काम केले.
5 / 10
बिजय आनंदच्या आयुष्यात अनेक चढऊतार आलेत आणि अखेर अभिनयाला रामराम ठोकण्याचा निर्णय त्याने घेतला.
6 / 10
रिपोर्टनुसार, बिजय आनंदला वयाच्या 26 व्या वर्षी आर्थराइटिसने पीडित झाला होता.
7 / 10
या आजारानंतर बिजय आनंदने आपल्या आरोग्यावर लक्ष केंद्रीत केले आणि योगसाधना सुरु केली. पुढे तो यातच इतका रमला की, स्वत:चे योगा सेंटर सुरु केले.
8 / 10
1998 साली ‘औरत’ मालिकेत तो दिसला होता. त्यानंतर 2002 साली ‘रामायण’ या मालिकेत त्याने लक्ष्मणची भूमिका साकारली. त्यानंतर तब्बल सोळा वर्षे बॉलिवूड व टेलिव्हिजनमधून तो गायब झाला होता.
9 / 10
अचानक पुन्हा एकदा त्याने मालिकेतून कमबॅक केले. ‘दिल ही तो है’ या मालिकेत मुख्य भूमिका साकारून पुनरागमन केले. त्यानंतर ‘सिया के राम’ मालिकेत त्याने राजा जनकची भूमिका साकारली होती.
10 / 10
आता अभिनयातून वेळ काढत तो योगा शिबिरही घेत असतो. सोबत वेळ मिळेल तसा अभिनयही करतो. सध्या तो ‘द राइज ऑफ शिवगामी’ या सीरिजमध्ये बिजय आनंद काम करतोय.
टॅग्स :बिजय आनंद