Join us  

Kangana Ranaut : 7 किलो सोनं, 60 किलो चांदी, 50 LIC पॉलिसी...; कोट्यवधींची मालकीण आहे कंगना राणौत

By ऑनलाइन लोकमत | Published: May 14, 2024 7:25 PM

1 / 13
क्वीन... तेजस, तनु वेड्स मनू सारखे दमदार चित्रपट देणाऱ्या कंगना राणौतने बॉलिवूड चित्रपटांमध्ये आपल्या अभिनयाची छाप सोडली आहे. यानंतर तिने राजकारणात दमदार एन्ट्री केली आहे. हिमाचल प्रदेशातील मंडी लोकसभा मतदारसंघातून भारतीय जनता पक्षाच्या वतीने उमेदवारी अर्ज दाखल केला आहे.
2 / 13
राजकारणात येण्याआधीही अभिनेत्री विविध मुद्द्यांवर आपले राजकीय विचार मांडताना दिसत होती. भाजपाच्या करोडपती उमेदवारांच्या यादीत कंगना राणौतचा समावेश आहे. तिच्या संपत्तीबाबत जाणून घेऊया...
3 / 13
देशात लोकसभा निवडणुका सुरू असून मतदानाचे चार टप्पे पार पडले आहेत. उर्वरित तीन टप्प्यांसाठी उमेदवारी अर्ज भरण्याची प्रक्रियाही सुरू आहे आणि याच क्रमाने आज बॉलिवूड अभिनेत्री कंगना राणौत हिने हिमाचलच्या मंडी मतदारसंघातून उमेदवारी अर्ज दाखल केला.
4 / 13
राजकारणावर मोकळेपणाने विचार मांडणाऱ्या कंगना राणौतचा जन्म हिमाचलच्या मंडी जिल्ह्यात 23 मार्च 1987 रोजी झाला. कंगना राणौतची एकूण संपत्ती ही निवडणूक आयोगाला दिलेल्या प्रतिज्ञापत्रात 90 कोटींहून अधिक असल्याचं म्हटलं आहे.
5 / 13
कंगना राणौतकडे 2 लाख रुपये रोख आहेत आणि तिची सर्व बँक खाती, शेअर्स-डिबेंचर्स आणि दागिन्यांसह एकूण जंगम मालमत्ता 28,73,44,239 रुपये आहे. तर स्थावर मालमत्ता 62,92,87,000 रुपये आहे.
6 / 13
निवडणूक प्रतिज्ञापत्रानुसार, 6 किलो 700 ग्रॅम सोनं आणि दागिने आहेत, ज्याची किंमत सुमारे 5 कोटी रुपये आहे. याशिवाय तिच्याकडे 60 किलो चांदी आहे, ज्याची किंमत 50 लाख रुपये आहे. याशिवाय कोट्यवधींचे हिऱ्यांचे दागिने आहेत, ज्यांची किंमत 3 कोटींहून अधिक आहे.
7 / 13
कंगना महागड्या आणि आलिशान कारचीही शौकीन आहे. तिच्या कार कलेक्शनमध्ये अनेक वाहनं आहेत. निवडणूक आयोगाला दिलेल्या प्रतिज्ञापत्रात तिन दोन गाड्यांचा उल्लेख केला आहे. यापैकी एक BMW 7-Series आहे आणि दुसरी Mercedes Benz GLE SUV आहे. या दोन्ही कारची एकूण किंमत 1.56 कोटी रुपये असल्याचे सांगण्यात येत आहे.
8 / 13
कंगना राणौतच्या जंगम मालमत्तेचा तपशील पाहिला तर सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे तिच्या नावावर एक किंवा दोन नाही तर 50 एलआयसी पॉलिसी आहेत आणि या सर्व पॉलिसी एकाच तारखेला, 4 जून 2008 रोजी खरेदी केल्या गेल्या होत्या.
9 / 13
अभिनेत्रीने शेअर्समध्येही गुंतवणूक केली आहे. तिच्याकडे मणिकर्णिका फिल्म्स प्रायव्हेट लिमिटेडचे ​​9999 शेअर्स आहेत, ज्यामध्ये तिची टोटल कॅपिटल इन्वेस्टमेंट अमाऊंट 1.20 कोटी रुपयांपेक्षा जास्त आहे.
10 / 13
रिपोर्ट्सनुसार, कंगना एका चित्रपटासाठी 15 ते 25 कोटी रुपये फी घेते. कंगनाच्या इतर सर्वाधिक आवडलेल्या चित्रपटांमध्ये लम्हे, फॅशन, राज 2, वन्स अपॉन अ टाइम इन मुंबई, मणिकर्णिका आणि पंगा यांचा समावेश आहे.
11 / 13
कंगनाच्या संपत्तीचा एक मोठा भाग तिच्या चित्रपटांमधील अभिनयाच्या कमाईतून येतो, तर दुसरीकडे, ती ब्रँड एंडोर्समेंट्सद्वारे देखील भरपूर कमाई करते. रिपोर्ट्सनुसार, कंगना रणौत एका ब्रँडच्या जाहिरातीसाठी 3-3.5 कोटी रुपये फी घेते.
12 / 13
उत्पन्नाच्या इतर स्रोतांमध्ये इतर गोष्टीही महत्त्वाची भूमिका बजावतात. अभिनेत्री असण्यासोबतच कंगना एक दिग्दर्शिका आणि चित्रपट निर्माती देखील आहे, यामुळे याचाही तिच्या उत्पन्नातही मोठा वाटा आहे.
13 / 13
कंगना राणौतचा मनाली, हिमाचल येथे एक आलिशान बंगला आहे, ज्याची किंमत जवळपास 25 कोटी रुपये आहे. याशिवाय मुंबईत पाच बेडरूमचं अपार्टमेंट आहे, ज्याची किंमत 15 ते 20 कोटी रुपये आहे. मुंबईतील पाली हिल येथे एक मोठं ऑफिस आहे, ज्याची किंमतही कोट्यवधी आहे.
टॅग्स :कंगना राणौतलोकसभा निवडणूक २०२४