Join us  

विकी कौशल अन् कतरिना कैफने कंगनाला पाठवलं खास गिफ्ट; इंस्टाग्राम फोटो शेअर करत म्हणाली...

By ऑनलाइन लोकमत | Published: December 12, 2021 5:47 PM

1 / 6
बॉलिवूड अभिनेता विकी कौशल (vicky kaushal) आणि कतरिना कैफ (katrina kaif) या जोडीचा बहुप्रतिक्षीत ठरलेला लग्नसोहळा अखेर ९ डिसेंबरला पार पडला. मोजक्या पाहुण्यांच्या उपस्थितीत पार पडलेल्या या लग्नसोहळ्याची सध्या सर्व स्तरांमध्ये चर्चा रंगली आहे.
2 / 6
राजस्थानमधील माधोपूर येथील एका आलिशान राजवाड्यात विकी -कतरिनाचा विवाह सोहळा पार पडला. या लग्नसोहळ्यात मेहंदीपासून ते हळदीपर्यंत प्रत्येक कार्यक्रमाचं जंगी आयोजन करण्यात आलं होतं.
3 / 6
सध्या या लग्नसोहळ्यातील फोटो समोर येत असून सगळीकडे कतरिनाच्या मेहंदीची चर्चा रंगली आहे. कतरिनाने केवळ मेहंदी सोहळ्यासाठी जवळपास ५० हजार ते १ लाख रुपयांपर्यंत खर्च केल्याचं सांगण्यात येत आहे.
4 / 6
नवविवाहित जोडपे विकी कौशल आणि कतरिना कैफ बॉलिवूड सेलिब्रिटींना रिटर्न गिफ्ट पाठवत आहेत.
5 / 6
दरम्यान त्यांनी बॉलिवूड क्वीन कंगना रणौतलादेखील भेट पाठवली आहे. कंगनाने तिच्या अधिकृत इंस्टाग्राम अकाऊंटवर फोटो शेअर करत त्यासंदर्भात माहिती दिली आहे. विकी-कतरिनाने कंगनाला साजुक तुपातल्या लाडवांची भेट दिली आहे.
6 / 6
कंगनाने लाडवांचा फोटो शेअर करत विकी आणि कतरिनाचे आभार मानले आहेत. तसेच त्यांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छादेखील दिल्या आहेत. विकी कतरिनाच्या नात्यावर भाष्य करणारी एक पोस्ट कंगनाने याआधीदेखील सोशल मीडियावर शेअर केली होती.
टॅग्स :विकी कौशलकतरिना कैफकंगना राणौतबॉलिवूड