Join us

कनिका कपूरपासून ते अमिताभ बच्चन यांच्यापर्यंत, कोरोनाच्या विळख्यात अडकले हे कलाकार

By ऑनलाइन लोकमत | Published: July 13, 2020 2:45 PM

1 / 8
देशभरात कोरोनाचा प्रादुर्भाव दिवसेंदिवस वाढत चालला आहे. कोरोनामुळे आतापर्यंत अनेकांचा मृत्यू झाला आहे. कोरोना व्हायरसच्या विळख्यात सामान्यांप्रमाणे सेलिब्रेटींनाही कोरोनाची लागण झाली आहे. बॉलिवूडचे सुपरस्टार अमिताभ बच्चन यांनाही नुकतीच कोरोनाची लागण झाली आहे. अमिताभ बच्चन यांना थोडीफार लक्षण दिसल्यामुळे त्यांना नानावटी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. ही माहिती खुद्द अमिताभ बच्चन यांनी ट्विटरवर दिली आहे. अमिताभ बच्चन यांनी ट्विट केले की, माझा कोरोनाचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आला आहे. मला रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. कुटुंब आणि इतर स्टाफचीदेखील टेस्ट करण्यात आली आहे. मागील दहा दिवसांपासून माझ्या जवळपास जे कुणी होते त्यांनी कृपया तपासणी करून घ्या.
2 / 8
अमिताभ बच्चन कोरोना पॉझिटिव्ह आल्यानंतर त्यांचा मुलगा म्हणजेच अभिनेता अभिषेक बच्चनलादेखील कोरोनाची लागण झाली आहे. 44 वर्षीय अभिषेक बच्चनची कोरोना टेस्ट अमिताभ बच्चन यांचा कोरोनाचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आल्यानंतर केला. संपूर्ण बच्चन कुटुंब आणि त्यांच्या स्टाफची टेस्ट करण्यात आली आहे. अभिषेक बच्चन त्याची वेबसीरिज ब्रीद इंटू द शेडोजच्या डबिंगसाठी घरातून बाहेर गेला होता.
3 / 8
कनिका कपूरची कोरोना टेस्ट पॉझिटिव्ह येणारी ती बॉलिवूडची पहिली सेलिब्रेटी होती. मार्च महिन्यात तिने कोरोना पॉझिटिव्ह असल्याचे सांगितले होते. त्यानंतर देशभरात खूप खळबळ माजली होती. त्यानंतर कनिका जवळपास महिनाभर रुग्णालयात दाखल होती आणि आती ती पूर्ण बरी झाली आहे.
4 / 8
टीव्ही अभिनेत्री व डान्सर मोहिना कुमारी सिंगने काही दिवसांपूर्वी सांगितले होते की, तिला व तिच्या नवऱ्यासह सासरच्या सर्वांना कोरोना झाला होता. मोहिना व तिच्या कुटुंबातील लोकांनी रुग्णालयात उपचार केला आणि जवळपास महिनाभरात ते सगळे बरे होऊन घरी परतले. मोहिनाने सांगितले होते की, तिचा हा प्रवास खूप थकवणारा होता.
5 / 8
पूरब कोहली आपल्या पत्नी व मुलांसोबत लंडनमध्ये राहतो आहे. एप्रिल महिन्यात पूरब कोहलीने सांगितले होते की एकेक एक करून कसे त्याच्या कुटुंबातील सर्व सदस्यांना कोरोना झाला होता. त्याच्या मुलीपासून कोरोनाची लागण सुरू झाली आणि एक वर्षांपर्यंत मुलांपर्यंत सर्वांनाच कोरोनाची लागण झाली होती. पूरब आणि त्यांचे कुटुंबाला डॉक्टरांचा सल्ला घेऊन उपचार केला आणि ते बरेदेखील झाले.
6 / 8
म्युझिक कंपोझर वाजिद खानला किडनी इन्फेक्शन झाले होते आणि त्याला कोरोनाची लागणदेखील झाली होती. त्यानंतर आता 1 जूनला त्याचे निधन झाले होते. त्याचे निधन कार्डियक अरेस्टमुळे झाले होते.
7 / 8
अभिनेत्री जोआ मोरानी, तिचे वडील निर्माते करीम मोरानी आणि बहिण शजा मोरानी यांना एप्रिल महिन्यात कोरोनाची लागण झाली होती. या सर्वांना रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. त्यानंतर ते सगळे बरेदेखील झाली. जोआने आतापर्यंत बऱ्याच वेळा प्लाझ्मा डोनेट केला आहे.
8 / 8
बॉलिवूड अभिनेता किरण कुमार यांनादेखील कोरोनाची लागण झाली होती. त्यांना कोणतेच लक्षण दिसले नव्हते आणि आता ते बरे आहेत. मे महिन्याच्या अखेरीस त्यांची कोरोना टेस्ट निगेटिव्ह आली होती आणि ते कोरोना मुक्त झाले.
टॅग्स :कोरोना वायरस बातम्याअमिताभ बच्चनअभिषेक बच्चनकनिका कपूरकिरण कुमार