कोरोना व्हायरसवर मात दिल्यानंतर कनिका घालवतेय असा वेळ, पाहा तिचे हे खास फोटो
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 28, 2020 15:25 IST
1 / 8काही दिवसांपूर्वी कनिका कपूरला कोरोना व्हायरसची लागण झाली होती.2 / 8कनिका आता पूर्णपणे बरी झाली असून ती तिच्या कुटुंबियांसोबत वेळ घालवत आहे.3 / 8कनिकाने सोशल मीडियावर तिच्या कुटुंबियांसोबतचा फोटो पोस्ट केला असून हा फोटो तिच्या चाहत्यांना प्रचंड आवडत आहे.4 / 8कनिकाने या फोटोसोबत कॅप्शन लिहिली आहे की, तुम्हाला चांगले जीवन जगण्यासाठी केवळ एक गोड हास्य आणि एक कप चहाची गरज आहे.5 / 8कनिका अनेक दिवस लखनऊमधील रुग्णालयात दाखल होती. पण तिने या आजारावर मात केली असून ती घरी परतली आहे.6 / 8कनिकाने कोरोनाचा फैलाव केला असा आरोप तिच्यावर लावण्यात आला असून तिच्याविरोधात तक्रार देखील दाखल करण्यात आली आहे.7 / 8परदेशातून आल्यानंतर कनिकाने क्वांरंटाईनमध्ये न राहाता काही पार्टींना हजेरी लावली होती.8 / 8करिनाचा कोरोनाचा रिपोर्ट अनेकवेळा पॉझिटिव्ह आल्याने तिच्या कुटुंबियांना चांगलेच टेन्शन आले होते. अनेक दिवसांच्या उपचारानंतर तिचा रिपोर्ट निगेटिव्ह आला आणि त्याचनंतर तिला रुग्णालयातून घरी जाण्याची परवानगी देण्यात आली.