Join us

'अग्निपथ'मधील हृतिकची ऑनस्क्रीन बहीण आठवते का? आता दिसतेय बोल्ड अँड ग्लॅमरस!

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 25, 2025 14:54 IST

1 / 8
२०१२ साली आलेल्या हृतिक रोशनचा 'अग्निपथ' (Agneepath) सिनेमा आठवत असेलच. यामध्ये हृतिक आणि प्रियंका चोप्राची जोडी होती. तर संजय दत्त खलनायक होता.
2 / 8
शिवाय सिनेमात हृतिकच्या बहिणीच्या भूमिकेत दिसलेल्या अभिनेत्रीने लक्ष वेधून घेतलं होतं. तिचा निरागस लूक आणि सुंदर अभिनय प्रेक्षकांच्या मनाला भावला.
3 / 8
आता १२ वर्षांनी ती बालकलाकार कशी दिसते? याची उत्सुकता तुम्हालाही असेल. 'अग्निपथ'मध्ये तिने शिक्षा ही भूमिका साकारली होती. तिचं खरं नवा कनिका तिवारी(Kanika Tiwari) असं आहे. अग्निपथ वेळी ती फक्त १५ वर्षांची होती.
4 / 8
5 / 8
लाल रंगाच्या स्लीव्हलेस गाऊनमध्ये ती खूपच सुंदर दिसत आहे. या लूकमध्ये तिने अनेक फोटो शेअर केले आहेत. तिच्या ग्लॅमरस अदांवर चाहतेही फिदा झालेत.
6 / 8
'अग्निपथ' नंतर तिने 'मन्नू और मुन्नी की शादी' या सिनेमातही काम केलं होतं. यामध्ये तिच्यासोबत मराठमोळा अभिनेता श्रेयस तळपदे झळकला होता.
7 / 8
कनिकाने तेलुगू, तमिळ आणि कन्नड भाषांमध्ये फिल्म्स केल्या आहेत. सध्या साऊथमधील ती प्रसिद्ध अभिनेत्री आहे. 'बॉय मीट्स गर्ल','रंगन स्टाईल','अवी कुमार' या सिनेमात तिने काम केलं आहे.
8 / 8
कनिकाला पुन्हा हिंदी सिनेमात पाहण्यासाठी चाहते उत्सुक आहेत. मात्र अद्याप तिला हिंदी फिल्म इंडस्ट्रीतून काही ऑफर आलेली नाही.
टॅग्स :सेलिब्रिटीहृतिक रोशनबॉलिवूड