कधी पाण्याच्या बाटल्या विकल्या, तर कधी हॉटेलामध्ये राबला...,‘कांतारा’ फेम ऋषभ शेट्टीनं खूप काही भोगलं..!! By ऑनलाइन लोकमत | Published: July 07, 2023 11:43 AM1 / 11‘कांतारा’ (Kantara) या चित्रपटानं सर्वांना वेड लावलं आहे. या चित्रपटानंतर ऋषभ शेट्टी (Rishab Shetty) हे नाव चर्चेत आहे. ७ जुलै रोजी ऋषभ त्याचा ३९ वा वाढदिवस साजरा करणार आहे.2 / 11या अभिनेत्याने त्याच्या ब्लॉकबस्टर ‘कांतारा’चे दिग्दर्शन केले होते त्यानेच या चित्रपटाची कथा लिहिली आहे आणि तोच या कथेचा नायक आहे. म्हणजेच, चित्रपटात लीड रोलही त्यानेच साकारला आहे.3 / 11१२ वर्षांपूर्वी ऋषभ शेट्टीने आपला अभिनयाचा प्रवास सुरू केला होता तेव्हा एकदिवस आपण इतका मोठा स्टार बनू, असं त्यालाही वाटलं नव्हतं. पण आज ऋषभ शेट्टी मोठा स्टार आहे. आज त्याच्या वाढदिवसानिमित्त जाणून घेऊया काही इंटरेस्टिंग गोष्टी. 4 / 11तुम्हाला ऐकून आश्चर्य वाटेल पण ऋषभचा फिल्मी इंडस्ट्रीशी दूरदूरपर्यंत संबंध नाही. म्हणजे तो या इंडस्ट्रीत आऊटसाइडर आहे. पण याऊपरही आपल्या मेहनतीच्या जोरावर तो इथपर्यंत पोहोचला. यासाठी तब्बल 18 वर्षे त्याने अथक प्रयत्न केलेत. स्ट्रगल केला.5 / 11ऋषभ शेट्टीने कॉलेज पूर्ण केल्यानंतर अॅक्टिंगमध्ये करिअर करण्याचा निर्णय घेतला. यासाठी त्याने थिएटरमध्ये काम करायला सुरूवात केला. ‘कुंडापुरा’ हे त्याचं पहिलं नाटक हळूहळू तो नाटकात रूळला. लोकांनी त्याच्या अभिनयाचं कौतुक सुरू केलं आणि हे पाहून ऋषभचा आत्मविश्वास वाढला.6 / 11कॉलेजच्या दिवसांत छोटंमोठं काम करून तो पैसा कमावयचा. कधी त्याने पाण्याच्या बाटल्या विकल्या तर कधी रिअल इस्टेटमध्ये काम केलं. काही दिवस अगदी हॉटेलातही तो राबला. सोबत सोबत अॅक्टिंगमध्ये त्याचे प्रयत्न सुरू होते.7 / 112004 मध्ये त्याला पहिली संधी मिळाली. Nam Areali Ondina या चित्रपटात त्याला एक भूमिका मिळाली. पण त्याच्या भूमिकेला कोणतंही नाव नव्हतं. फक्त नावापुरती ही भूमिका ऋषभने हसत हसत स्विकारली. यानंतर अशाच अनेक चित्रपटांत छोटे छोटे रोल केलेत. कधी कॅमिओ तर कधी भिकाऱ्याचा रोल केला.8 / 1118 वर्षांच्या स्ट्रगल काळात त्याने खूप काही भोगलं. 2019 मध्ये लीड हिरो म्हणून त्याला पहिला ब्रेक मिळाला. बेल बॉटम या चित्रपटात त्याला हिरोची भूमिका मिळाली. पण यानंतरही त्याला म्हणावं तसं यश मिळालं नाही.9 / 112021 मध्ये त्याने ‘कांतारा’ बनवण्यचा विचार केला. स्वत: कथा लिहिली आणि यात स्वत:च अभिनय करण्याचा निर्णय घेतला. कांतारा’ स्वत:च दिग्दर्शित करण्याचं त्याने ठरवलं.10 / 11‘कांतारा’ चित्रपटाच्या शूटींगवेळी दैव कोलाच्या दरम्यान शरीरावर एवढा मोठा पोशाख घेऊन वावरणं ही गोष्ट खूपच अवघड होती. हे दृश्य चित्रीत करण्याआधी जवळपास महिनाभर ऋषभने मांसाहार पूर्णपणं बंद केला होता.11 / 11दैव कोला साकारताना तो केवळ शहाळं प्यायचा. चित्रीकरणाआधी आणि झाल्यानंतर त्याला प्रसाद दिला जायचा. केवळ शहाण्यावर असताना चित्रीकरण करत असल्यानं त्याच्या डोळ्यासमोर अनेकदा अंधारी यायची. परंतु न डगमगता त्यानं सिनेमाचं चित्रीकरण पूर्ण केलं आणि या मेहनतीचं फळ आज आपल्यासमोर आहे. आणखी वाचा Subscribe to Notifications