Kareena Kapoor Khan Birthday : करिनाने दोनदा नाकारलं होतं सैफचं प्रपोजल, तिनेच केला होता कारणाचा खुलासा! By अमित इंगोले | Published: September 21, 2020 12:14 PM1 / 10बॉलिवूड अभिनेत्री करिना कपूर खान आज तिचा ४०वा वाढदिवस साजरा करत आहे. करिनाने घरीच साध्या पद्धतीने तिचा वाढदिवस साजरा केला. यावेळी तिचे वडील रणधीर कपूर, आई बबीता, बहीण करीश्मा आणि पती सैफ अली खान होता. करिना कपूर आणि सैफ अली खान बॉलिवूडच्या सर्वात लोकप्रिय जोडींपैकी एक आहे. 2 / 10दोघांनी २०१२ मध्ये लग्न केलं होतं. २०१६ मध्ये पहिल्यांचा करिना आई झाली होती. आता पुन्हा तिच्याकडे गूडन्यूज आहे. पण अनेकांना हे माहीत नसेल की, करिनाने सैफचं लग्नाचं प्रपोजल २ वेळा नाकारलं होतं. आज आम्ही तेच गुपित तुम्हाला सांगणार आहोत.3 / 10करिना कपूर आज ४०वा वाढदिवस साजरा करत असल्याने तिच्याबाबतच्या अनेक गोष्टींची सध्या चर्चा होत आहे. 4 / 10सैफ अली खानसोबत लग्नापासून ते मुलाच्या नावापर्यंत सगळ्याच गोष्टींही भरभरून चर्चा झाली. एका मुलाखतीत करिनाने सैफसोबतच्या लग्नाबाबतचा मोठा खुलासा केला होता. ती म्हणाली होती की, मी दोनदा सैफचं प्रपोजल नाकारलं होतं.5 / 10करिना कपूर ही सैफची दुसरी पत्नी आहे. सैफ अली खानपेक्षा करिना १० वर्षे लहान आहे. दोघांनी २०१२ मध्ये लग्न केलं होतं. याआधी दोघांनी एकमेकांना काही वर्षे डेट केलं होतं.6 / 10शाहीद कपूरसोबत ब्रेकअप झालल्यावर करिनाची सैफसोबत २००८ मध्ये 'टशन' सिनेमाच्या सेटवर झाली होती. यादरम्यानच दोघांमध्ये जवळीकता वाढली होती. नंतर हळूहळू दोघे एकमेकांच्या प्रेमात पडले.7 / 10सैफ आणि करिनाचं लग्न तसं फार सोपं नव्हतं. लग्नापासून ते मुलगा होण्यापर्यंत त्यांना वेगवेगळ्या वादांचा सामना करावा लागला.8 / 10करिनासोबत लग्न करण्यासाठी सैफलाही खूप काही करावं लागलं. टाइम्स ऑफ इंडियाला दिलेल्या एका मुलाखती करिनाने सांगितले होते की, सैफने तिला पॅरिसमध्ये दोनदा प्रपोज केलं होतं. तेव्हा करिना म्हणाली होती की, 'मला नाही माहीत, कारण मी तुला अजून पूर्णपणे ओळखत नाही'.9 / 10पण हा पूर्णपणे करिनाचा नकार नव्हता. करिना अर्थ हा होता की, मला तुला आणखी जाणून घ्यायचं आहे. बऱ्याच वर्षानी करिनाने सैफसोबत लग्नाला होकार दिला होता आणि आज ती तिचा निर्णय योग्य असल्याचं मानते.10 / 10करिना आणि सैफ सध्या एक आनंदी जीवन जगत आहेत. काही दिवसांपूर्वीच करिनाने ती पुन्हा आई होणार असल्याची बातमी फॅन्सना दिली होती. त्यावरूनही ती सध्या चर्चेत आहे. आणखी वाचा Subscribe to Notifications