Join us

शाहिद कपूरपेक्षा जास्त टॅक्स भरते करीना कपूर, कतरिना कैफ अन् कियारालाही सोडलं मागे

By ऑनलाइन लोकमत | Published: September 05, 2024 3:18 PM

1 / 10
बॉलिवूडची बेबो म्हणजेच अभिनेत्री करीना कपूरचा भारतासह जगभरात मोठा चाहतावर्ग आहे.
2 / 10
ती कायम चर्चेत असते. आता पुन्हा एकदा तिनं सर्वांचं लक्ष वेधलं आहे.
3 / 10
करीना कपूरचं नाव आता भारतातील सर्वाधिक करदात्यांच्या यादीत सामील झालं आहे.
4 / 10
एवढंच नाही तर करीना ही शाहिद कपूर, कतरिना कैफ आणि कियारा आडवाणी यांच्यापेक्षाही जास्त कर भरते.
5 / 10
शाहीदने यंदा १४ कोटी तर कतरिनाने ११ कोटी कर भरला आहे. कियारा आडवाणी हिने १२ कोटी कर भरला.
6 / 10
मीडिया रिपोर्टनुसार, 2024 च्या आर्थिक वर्षात करीनाने सुमारे २० कोटी रुपये टॅक्स भरला आहे.
7 / 10
करीन कपूरची तगडी कमाई होते. आज ती बी टाऊनची टॉप अभिनेत्री आहे. करिनाने अनेक ब्लॉकबस्टर चित्रपट दिले असून बी-टाऊनवर राज्य केलं आहे.
8 / 10
कपूर घराण्याची मुलगी आणि पतौडी घराण्याची सून करीना कपूर खान हिने केवळ प्रसिद्धीच नाही तर चित्रपटांमधूनही भरपूर पैसा कमावलाय.
9 / 10
आज ही अभिनेत्री कोट्यवधींची मालकीण आहे. CNBC TV 18 च्या रिपोर्टनुसार, करीना कपूर खानची एकूण संपत्ती 485 कोटी रुपये आहे.
10 / 10
रिपोर्टनुसार, करीना तिच्या प्रत्येक चित्रपटासाठी 10-12 कोटी रुपये मानधन घेते. ती प्रत्येक ब्रँड एंडोर्समेंटसाठी पाच कोटी रुपये घेते. झूमनुसार, तिची वार्षिक कमाई 12 कोटी रुपयांपेक्षा जास्त आहे.
टॅग्स :करिना कपूरशाहिद कपूरकतरिना कैफकियारा अडवाणीसेलिब्रिटीबॉलिवूड