Join us

Kareena Kapoor : जेहच्या जन्मानंतर करीनाचं वाढलं २५ किलो वजन; टेन्शनमध्ये आली बेबो, झाली इनसिक्युअर

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 4, 2025 14:37 IST

1 / 9
अभिनेत्री करीना कपूर दोन मुलांची आई आहे. करिना तिच्या प्रेग्नेंसी दरम्यान पूर्णपणे एक्टिव्ह राहिली. डिलिव्हरीनंतर तिने वजन लवकर कमी केलं.
2 / 9
करीना तिच्या फिटनेससाठीही ओळखली जाते. दोन्ही प्रेग्नेंसीच्या वेळी ती एक सुपरफिट मॉम राहिली आहे. पण एक वेळ अशी आली जेव्हा तिला तिच्या वजनाबद्दल इनसिक्युअर वाटू लागलं.
3 / 9
करीनाने सांगितलं की, तिचा दुसरा मुलगा जहांगीरच्या जन्मावेळी तिचं वजन तब्बल २५ किलोने वाढलं होतं.
4 / 9
अभिनेत्रीची मैत्रीण आणि न्यूट्रिशनिस्ट रुजुता दिवेकर यांच्या पुस्तक प्रकाशन सोहळ्यात करीनाने याबाबत खुलासा केला आहे.
5 / 9
या कार्यक्रमात अभिनेत्रीने तिच्या अन्नावरील प्रेमाबद्दल सांगितलं आहे. तिला जे हवं असतं ते ती खाते असं सांगितलं. स्वतःला नेहमी आनंदी ठेवते.
6 / 9
'जेहच्या जन्मानंतर एक क्षण असा आला. जेव्हा मला वाटलं अरे देवा, मला परत जावं लागेल. हे वजन पुन्हा कमी करावं लागेल.'
7 / 9
'ही भावना फक्त काही एका सेकंदासाठी होती. यानंतर लगेचच मला वाटलं की, मी अजूनही खूप छान दिसत आहे. माझं वजन २५ किलोनी वाढलं होतं' असं अभिनेत्रीने म्हटलं.
8 / 9
करिना इंडस्ट्रीमध्ये एक ट्रेंडसेटर राहिली आहे. तिनेच झिरो फिगर ही कॉन्सेप्ट आणली होती. 'टशन' चित्रपटासाठी तिने वजन कमी केलं होतं.
9 / 9
करीना कपूर सोशल मीडियावर एक्टिव्ह असून ती नेहमीच तिचे ग्लॅमरस फोटो शेअर करत असते.
टॅग्स :करिना कपूरबॉलिवूडवेट लॉस टिप्स