कलाकारांचा रात्रभर धिंगाणा अन् शेजाऱ्यांना फुकटची डोकेदुखी, मध्यरात्री 'या' सेलिब्रिटींच्या घरी आलेत पोलिस By ऑनलाइन लोकमत | Published: March 30, 2023 1:44 PM1 / 8बॉलिवूड कलाकार म्हणलं की त्यांच्या रात्रभर चालणाऱ्य पार्ट्या आल्याच. सेलिब्रिटींच्या आयुष्यात काय सुरु आहे, त्यांचा दिनक्रम काय असेल अशी चाहत्यांना उत्सुकता असते. पण याउलट सेलिब्रिटींचे शेजारी मात्र त्यांच्या या पार्ट्यांना भयानक वैतागलेले असतात. मध्यरात्री तर अनेक वेळा पहाटेपर्यंत सेलिब्रिटींचा पार्टीत धिंगाणा सुरु असेल तर शेजाऱ्यांची झोपमोड होते.2 / 8आपल्या करिअरमध्ये अनेक ब्लॉकबस्टर सिनेमे देणारी 'बेबो' म्हणजेच अभिनेत्री करिना कपूर खानची (Kareena Kapoor Khan) तिच्या शेजाऱ्यांनी पोलिसात तक्रार केली होती. 2016 मध्ये जेव्हा करिनाने तिच्या घरी पार्टीचे आयोजन केले होते. रात्रभर चालणाऱ्या पार्टीमुळे तिचे शेजारी चांगलेच संतापले. त्यांनी ताबडतोब पोलिसांना बोलवले होते. तेव्हा करिनाच्या या पार्टीची चांगलीच चर्चा झाली होती.3 / 8अभिनेता रणबीर कपूर (Ranbir Kapoor) नेहमीच चाहत्यांमध्ये चांगलाच लोकप्रिय आहे. लेट नाईट पार्टीमुळे त्याचीही शेजाऱ्यांनी तक्रार केली आहे. पार्टीत जोरजोरात चालणाऱ्या संगीताच्या आवाजामुळे त्याचीही पोलिसात तक्रार करण्यात आली आहे. 4 / 8ऐश्वर्या राय बच्चन (Aishwarya Rai Bachchan) बॉलिवूडमध्ये अतिशय हुशार अभिनेत्री म्हणून ओळखली जाते. समाजाचं भान तिने कायम राखलं आहे. मात्र तिचीही शेजाऱ्यांनी तक्रार केली आहे. सलमान खान याला कारणीभूत ठरला होता. जेव्हा दोघांच्या अफेअरच्या चर्चा रंगल्या होत्या तेव्हा सलमान खानने अनेकदा ऐश्वर्या रायच्या घराखाली हंगामा केला होता. यामुळेच तिच्या शेजाऱ्यांनी तिच्याविरोधात तक्रार केली होती.5 / 8अभिनेत्री प्रिती झिंटा (Prity Zinta) करिअरच्या सुरुवातीला मुंबईत एका फ्लॅटमध्ये राहायची. यावेळी ती अनेकदा सोसायटीत चकरा मारायची तेव्हा तिच्यासोबत सुरक्षारक्षक असायचे. पार्कमध्ये खेळणाऱ्या लहान मुलांनी तिचे सुरक्षारक्षक अनेकदा रागवायचे. यावरच नाराज होत तिच्या सोसायटीतील लोकांनी तिची पोलिसात तक्रार केली होती.6 / 8चॉकलेट बॉय शाहीद कपूरही (Shahid Kapoor) शेजाऱ्यांच्या कचाट्यात सापडला आहे. शाहीदच्या जुहूतील बंगल्यात काम सुरु होते. काम करणाऱ्या मजुरांमुळे त्याचे शेजारी परेशान झाले होते. या त्रासाला कंटाळत शेजाऱ्यांनी शाहीद विरोधात तक्रार दाखल केली होती.7 / 8अभिनेता आदित्य पांचोली (Aditya Pancholi) आणि वाद हे जुनंच समीकरण आहे. एक दिवस त्याचं आणि शेजाऱ्यांचं जोरदार भांडण झालं होतं. वाद इतका पेटला की पोलिसांना बोलवावं लागलं. अभिनेत्याच्या घरी काही पाहुणे आले होते आणि या पाहुण्यांनी त्यांच्या गाड्या सोसायटीतील इतर सदस्यांच्या ठराविक पार्किंगच्या जागेवर लावल्या होत्या. याचीच तक्रार शेजाऱ्यांनी आदित्यकडे केली असता वाद वाढला.8 / 8अभिनेता शक्ती कपूरवर (Shakti Kapoor) तर त्याच्या शेजाऱ्यांनी गंभीर आरोप केला होता. फार जुनं प्रकरण आहे. शक्ती कपूर इमारतीच्या कॉरिडॉरमध्ये दारु पिऊन नग्न फिरत होता. याविरोधात शेजाऱ्यांनी त्याची पोलिसात तक्रार दाखल केली. यानंतर शक्ती कपूरने चूक मान्य करत माफी मागितली होती. तेव्हा कुठे प्रकरण थंड झालं. आणखी वाचा Subscribe to Notifications