Join us  

फोटोत दिसणाऱ्या या सुंदर चिमुकल्या कोण? आता दिसतात इतक्या हॉट की ओळखूही येणार नाही

By ऑनलाइन लोकमत | Published: September 22, 2024 10:42 AM

1 / 8
अनेक सेलिब्रिटींचे बालपणीचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत असतात. आपले आवडते कलाकार बालपणी कसे दिसायचे, याबाबत चाहत्यांनाही उत्सुकता असते.
2 / 8
सध्या बॉलिवूडमधील दोन अभिनेत्रींचा बालपणीचा असाच एक फोटो समोर आला आहे. या फोटोत दिसणाऱ्या दोन अभिनेत्री या बहिणी असून बॉलिवूड गाजवत आहेत.
3 / 8
या अभिनेत्री दुसऱ्या तिसऱ्या कोणी नसून कपूर सिस्टर्स आहेत. बॉलिवूडची बेबो करीना कपूरचा वाढदिवस नुकताच झाला. करीनाच्या वाढदिवशी लोलो म्हणजेच करिश्मा कपूरने बालपणीचे काही फोटो शेअर करत शुभेच्छा दिल्या.
4 / 8
करिश्माने करीनाच्या बालपणीच्या वाढदिवस सेलिब्रेशनचे फोटो शेअर केले. या फोटोंमध्ये रणधीर कपूर आणि बबिता कपूरही दिसत आहेत.
5 / 8
करीनाने तिचा ४४ वाढदिवस सेलिब्रेट केला. तिच्या वाढदिवशी हे फोटो शेअर करत करिश्माने खास पोस्टही लिहिली होती.
6 / 8
'४ वर्षांपासून ते ४४ वर्षांपर्यंत...कायम एकत्र...तुझा वाढदिवस नेहमी सेलिब्रेट करणार...हॅपी बर्थडे टू बेस्ट सिस्टर', असं कॅप्शन तिने फोटोला दिलं होतं.
7 / 8
करिश्मा आणि करीना यांनी बॉलिवूडमध्ये ९०चं दशक गाजवलं. त्या दोघींनीही अनेक सुपरहिट सिनेमांमध्ये काम केलं आहे.
8 / 8
कपूर सिस्टर्स बॉलिवूडमधील करिअरबरोबरच त्यांच्या पर्सनल आयुष्यामुळेही चर्चेत असायच्या.
टॅग्स :करिना कपूरकरिश्मा कपूरसेलिब्रिटी