गरोदरपणात करिश्मा कपूरचा नवरा आणि सासूने केला होता छळ; अभिनेत्रीने भोगलाय कौटुंबिक हिंसाचार By ऑनलाइन लोकमत | Published: July 04, 2023 12:59 PM1 / 10९० चा काळ गाजवणारी लोकप्रिय अभिनेत्री म्हणजे करिश्मा कपूर. आजवरच्या कारकिर्दीत करिश्माने अनेक गाजलेल्या सिनेमांमध्ये काम केलं. 2 / 10 करिश्मा कपूर वैयक्तिक आयुष्यामुळे कायमच चर्चेत राहिली. प्रोफेशनल आयुष्यात तिने एकापेक्षा एक हिट सिनेमे दिले मात्र खाजगी आयुष्यात तिला दु:ख सोसावं लागलं.3 / 10 यशाच्या शिखरावर असतानाच करिश्माचं उद्योगपती संजय कपूरसोबत (Sanjay Kapoor) लग्न झालं. मात्र काही वर्षांनी करिश्मा संजय आणि त्याच्या कुटुंबियांवर घरगुती हिंसाचाराचा आरोप लावला आणि तिने घटस्फोट घेतला. 4 / 102003 मध्ये अभिनेत्री करिश्मा कपूरने बिझनेसमन संजयसोबत लग्नगाठ बांधली. या लग्नातून करिश्माला एक मुलगा आणि एक मुलगीही आहे.5 / 10मात्र लग्नाच्या ११ वर्षांनी २०१४ मध्ये दोघेही विभक्त झाले.6 / 10घटस्फोटाच्या प्रक्रियेदरम्यान दोघांनी एकमेकांवर अनेक आरोप केले होते. करिश्माने संजय आणि त्याची आई राणी यांच्यावर घरगुती हिंसाचाराचा गुन्हा दाखल केला होता.7 / 10करिश्मा गरोदर असताना सासूने तिचा छळ केल्याचं तिने याचिकेत म्हटलं होतं. 8 / 10संजयने त्याच्या आईला करिश्माच्या कानाखाली मारायले सांगितले. लग्नाच्या काही वर्षातच असा छळ होऊ लागल्याने करिश्माने घटस्फोट घेण्याचा निर्णय घेतला.9 / 10करिश्माने असेही म्हटले होते की, संजयचे विवाहबाह्य संबंध होते आणि त्याची आई त्याला या सगळ्यात साथ देत असे. 10 / 10करिश्मासोबत घटस्फोट घेतल्यानंतर संजय कपूरने दुसरं लग्न केलं. तर करिश्मा आजही एकटीच दोन्ही मुलांचा सांभाळ करत आहे. आणखी वाचा Subscribe to Notifications