Join us

केवळ अनुपम खेरच नाही तर बॉलिवूडचे हे लोकप्रिय कलाकारही आहेत काश्मीरी पंडित!

By ऑनलाइन लोकमत | Published: March 18, 2022 2:32 PM

1 / 9
Kashmiri Pandit Actors in Bollywood : यात अजिबात शंका नाही की, काश्मीर हे पृथ्वीवरील स्वर्ग आहे. तर दुसरीकडे दहशतवादी घटनांमुळेही काश्मीर चर्चेत असतं. काश्मीर पंडितांच्या पलायनावर सध्या 'द काश्मीर फाइल्स' सिनेमातून चर्चा होत आहे. या घटना अनुभवलेले अभिनेते अनुपम खेरही या सिनेमात आहेत. त्यांचा परिवार १९९० मध्ये या घटनेचे शिकार झाले होते. तसे बॉलिवूडमध्ये अनुपम खेर हे एकमेव काश्मीर पंडित नाहीयेत. अजूनही काही अभिनेते आहेत जे काश्मीरी पंडित आहे.
2 / 9
मोहित रैना - टीव्ही, बॉलिवूड आणि ओटीटीवरील एक प्रसिद्ध नाव म्हणजे मोहित रैना. ‘देवों के देव महादेव’ मध्ये भगवान शिवाची भूमिका साकारून लोकप्रिय झालेला मोहित रैनाने बॉलिवूड सिनेमेही केले आहेत. सध्या तो ओटीटीवर दिसत आहे. भौकाल वेबसीरीजमधील त्याच्या कामाचं खूप कौतुक झालं. मोहित हा एक काश्मीरी पंडित आहे. त्याचा जन्म १४ ऑगस्ट १९८२ मध्ये झाला होता. तो जम्मूत वाढला आणि जम्मूच्या केंद्रीय विद्यालयात त्याचं शिक्षण झालं.
3 / 9
कुणाल खेमू - अनेकांना माहीत नसेल की, कुणाल खेमू एक काश्मीरी पंडित आहे. त्याचा जन्म २५ मे १९८३ मध्ये एका काश्मीरी ब्राम्हण परीवारात झाला. त्याच्या वडिलांचं नाव रवि खेमू आहे आणि आईचं नाव ज्योति खेमू आहे. कुणालचा जन्म जम्मूमध्ये झाला आणि त्यानंतर ते मुंबईत शिफ्ट झाले.
4 / 9
एम.के.रैना - गंगूबाई काठियावाड़ी, रब ने बना दी जोड़ी आणि तारे ज़मीन सारख्या सिनेमात काम करणारे रैना देखील एक काश्मीरी पंडित आहेत. त्यांचा जन्म २४ जुलै १९४८ ला श्रीनगरमध्ये झाला होता. ते नॅशनल स्कूल ऑफ ड्रामाच्या १९७० च्या बॅचचे आहेत.
5 / 9
किरण कुमार - बॉलिवूडमधील प्रसिद्ध व्हिलन किरण कुमार हे सुद्धा एक काश्मीरी पंडित आहेत. त्यांनी त्यांच्या करिअरची सुरूवात १९६० मध्ये केली होती. त्यांचे वडील जीवन काश्मीरमधून मुंबईला आले होते, त्यानंतर किरण कुमार यांचा जन्म झाला होता.
6 / 9
राज कुमार - तुम्हाला वाचून आश्चर्य वाटेल की, प्रसिद्ध अभिनेते राजकुमार हे सुद्धा एक काश्मीरी पंडित होते. त्यांचं खरं नाव कुलभूषण पंडित आहे. राजकुमार यांचा जन्म एखा काश्मीरी पंडित परिवारात लोरालई(पाकिस्तान)मध्ये झाला होता.
7 / 9
ए.के. हंगल - 'शोले' सिनेमातील रहीम चाचा म्हणजे अवतार कृष्ण हंगल यांचा जन्म काश्मीरी पंडित परीवारात झाला होता. त्यांचा जन्म १ फेब्रुवारी १९१४ मध्ये पंजाबच्या सियालकोटमध्ये झाला होता. ते थिएटरमध्ये काम करत होते.
8 / 9
जीवन - खलनायकांचे बादशाह असं ज्यांना म्हटलं जातं ते जीवन यांचं खरं नाव ओंकार नाथ धर आहे. त्यांचा जन्म २४ ऑक्टोबर १९१५ मध्ये एका काश्मीरी पंडित परीवारात झाला होता. त्यांच्याबाबत सांगितलं जातं की, ते काश्मीरहून मुंबईला केवळ २६ रूपये घेऊन आले होते.
9 / 9
संजय सूरी - अभिनेता संजय सूरी देखील एक काश्मीरी पडित आहे. १९९० मध्ये काश्मीरमधून पलायन करणाऱ्या लोकांमध्ये त्यांचाही परीवार होता. फार कमी लोकांना माहीत असेल की, ३२ वर्षाआधी दहशतवादी हल्ल्यात त्याच्या वडिलांनाही गोळी मारण्यात आली होती.
टॅग्स :बॉलिवूडसेलिब्रिटीजम्मू-काश्मीर