Join us

PICS: कतरिनानं विकीला रोमँटिक अंदाजात दिल्या वाढदिवसाच्या शुभेच्छा, त्यावर अभिनेता म्हणाला...'

By ऑनलाइन लोकमत | Published: May 16, 2022 7:10 PM

1 / 6
अभिनेता विकी कौशलचा आज वाढदिवस आहे. लग्नानंतरचा बर्थ डे विकी न्यूयॉर्कमध्ये पत्नी आणि अभिनेत्री कतरिना कैफसोबत सेलिब्रेट करतोय. (Photo Instagram)
2 / 6
कतरिनाने न्यूयॉर्कमधील बर्थडे सेलिब्रेशनचे फोटो शेअर केले आहेत. या फोटोंमध्ये दोघेही रोमँटिक पोज देताना दिसत आहेत. कतरिना हे फोटो शेअर करत विकीला वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. पोस्टच्या कॅप्शनमध्ये लिहिले की, 'न्यूयॉर्कवाला वाढदिवस माझे प्रेम. सोप्या भाषेत सांगायचं झालं तर… तू सर्वकाही चांगलंच करतोस. (Photo Instagram)
3 / 6
कतरिनाच्या या पोस्टवर कमेंट करत तिच्या चाहत्यांनी सुद्धा विकिला वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. लोक दोघांच्या जोडीचे कौतुकही करत आहेत. (Photo Instagram)
4 / 6
विकीसाठी कतरिनाने शेअर केलेल्या या पोस्टला काही मिनिटांतच 8 लाखांहून अधिक लोकांनी लाईक केले आहे. विकीने कमेंट सेक्शनमध्ये लिहिले – 'शादीशुदावाला बर्थडे...' यासोबतच अभिनेत्याने अनेक हार्ट इमोजीही शेअर केले आहेत. (Photo Instagram)
5 / 6
कतरिना कैफशिवाय इतर अनेक सेलिब्रिटींनी विकीला सोशल मीडियावर शुभेच्छा दिल्या आहेत. माधुरी दीक्षितपासून सारा अली खानपर्यंत सर्वांनी विकीला त्याच्या वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या.(Photo Instagram)
6 / 6
करिअरबद्दल बोलायचे झाले तर, लवकरच विकी कौशल त्याचा आगामी चित्रपट 'गोविंदा मेरा नाम'चे शूटिंग सुरू करणार आहे. (फोटो इन्स्टाग्राम)
टॅग्स :विकी कौशलकतरिना कैफ