कतरिना कैफची आई दिसते तिच्या इतकीच खूप सुंदर, पाहा विकी कौशलच्या सासूबाईंचे फोटो By ऑनलाइन लोकमत | Published: June 03, 2022 1:27 PM1 / 10बॉलिवूडमधील क्युट कपल कतरिना कैफ (Katrina Kaif) आणि विकी कौशल (Vicky Kaushal) त्यांच्या वैवाहिक जीवनाचा पुरेपूर आनंद घेत आहेत. लग्न झाल्यापासून या दोघांच्या फोटोंचा सोशल मीडियावर बोलबाला आहे. 2 / 10 कतरिना तिच्या सासरच्या मंडळींना तसेच आई-वडिलांना पूर्ण वेळ देते. कतरिना कैफच्या आईला तुम्ही पाहिलंत का? कतरिनाची आई तिच्यासारखीच खूप सुंदर दिसते. 3 / 10कतरिना कैफचा जन्म १६ जुलै १९८३ रोजी हाँगकाँगमध्ये झाला आहे. पण कतरिना कैफचे वडील भारतीय आहेत. 4 / 10ते मूळचे काश्मीरचे आहेत. त्यांचे नाव आहे मोहम्मद कैफ.5 / 10 तर कतरिनाची आई सुजैन टरकोट ही ब्रिटिश नागरिक आहे. कतरिना कैफचे वडील तिच्या आईला ब्रिटनमध्ये भेटले आणि दोघांनीही आपले कुटुंब तिथेच स्थायिक केले. परंतु काही वर्षांतच दोघांचा घटस्फोट झाला.6 / 10कतरिनाच्या कुटुंबात तिला ६ बहिणी आणि एक भाऊ असून कतरिनासह ८ भावंडे आहेत. कतरिना तिच्या भावंडांमध्ये पाचव्या क्रमांकावर आहे, इतर तीन बहिणी तिच्यापेक्षा लहान आहेत. 7 / 10इतकं मोठं कुटुंब असलेल्या कतरिनाने लहान वयातच काम करायला सुरुवात केली. तिची एक बहीण इसाबेल कैफने बॉलिवूडमध्ये पदार्पण केले आहे. 8 / 10कतरिनाला तिच्या आयुष्यात वडिलांची कमतरता जाणवते. 9 / 10ती एकदा एका मुलाखतीत म्हणाली होती, 'माझ्या वडिलांचा आमच्या संगोपनावर, आमच्या धार्मिक, सामाजिक किंवा नैतिक वर्तनावर कोणताही प्रभाव नाही. 10 / 10कतरिना खूप लहान होती जेव्हा तिचे वडील कुटुंब सोडून गेले. वडिलांचे प्रेम आपल्याला कधीच मिळाले नाही, याची तिला नेहमीच खंत वाटते. आणखी वाचा Subscribe to Notifications