KGF 2च्या यशानंतर फॅमिलीसोबत व्हॅकेशन एन्जॉय करतोय रॉकी भाई, पत्नीसोबतचे रोमॅंटिक फोटो व्हायरल By ऑनलाइन लोकमत | Published: April 29, 2022 1:34 PM1 / 8‘केजीएफ’ला अभूतपूर्व यश मिळालं आणि त्यामुळे मेकर्सनी ‘केजीएफ 2’ (KGF: Chapter 2) बनवण्याचा निर्णय घेतला. गेल्या 14 एप्रिलला ‘केजीएफ 2’ रिलीज झाला आणि या चित्रपटाच्या त्सुनामीत जर्सी व बीस्ट सारख्या सिनेमांचीही पार वाताहत झाली. ‘केजीएफ 2’ने बॉक्स ऑफिसवर अक्षरश: धुमाकूळ घातला. 12 दिवसांत या चित्रपटाने वर्ल्डवाईड 907.30 कोटींची कमाई केली. ‘केजीएफ 2’ लोकांनी अक्षरश: डोक्यावर घेतला. सध्या रॉकी भाई म्हणजेच यश पत्नी आणि मुलांसोबत व्हॅकेशन एन्जॉय करतोय.( Photo Instagram)2 / 8व्हॅकेशनचे फोटो यशची पत्नी राधिका पंडितने आपल्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर शेअर केले आहेत. ज्यामध्ये दोघेही रोमँटिक पोज देताना दिसत आहेत. (Photo Instagram)3 / 8सोशल मीडियावर राधिकाची फॅन फॉलोइंग पती यशपेक्षा कमी नाही. तिच्या प्रत्येक फोटोला लाखोंच्या संख्येने लाईक्स मिळतात. (Photo Instagram)4 / 8राधिका आणि यश यांना दोन मुलं आहेत. अनेकदा त्यांच्या मुलांसोबत फोटो शेअर करत असतात. (Photo Instagram)5 / 8राधिकासाठी तिची पहिली मालिका 'नंदा गोकुळा' खूप खास आहे कारण तिने या मालिकेतून पदार्पण केले होते आणि या मालिकेच्या सेटवर ती पहिल्यांदाच यशला भेटली होती. (Photo Instagram)6 / 8एकत्र काम करत असताना राधिका आणि यश यांची मैत्री झाली आणि नंतर हळूहळू दोघेही एकमेकांच्या प्रेमात पडले. (Photo Instagram)7 / 8राधिका आणि यश यांनी त्यांचे नाते सीक्रेट ठेवले आणि त्यांनी अगदी खाजगी पद्धतीने लग्नही केले. (Photo Instagram)8 / 8 आणखी वाचा Subscribe to Notifications