Join us

'या' गाजलेल्या सिनेमाच्या सीक्वल येणार, पहिल्या भागाने प्रेक्षकांना खळखळून हसवलं होतं

By ऑनलाइन लोकमत | Published: October 10, 2024 4:48 PM

1 / 7
हा फोटो पाहून सिनेमा कोणता याचा अंदाज आला का तुम्हाला. या सिनेमात अनुपम खेर यांनी प्रमुख भूमिका साकारली होती
2 / 7
या सिनेमाचं नाव आहे 'खोसला का घोसला'. या सिनेमात अनुपम खेर, रणवीर शोरे, बोमन इराणी यांनी प्रमुख भूमिका साकारली होती
3 / 7
'खोसला का घोसला' या गाजलेल्या सिनेमाच्या पुढील भागाची तयारी सुरु आहे. हो तुुम्ही बरोबर वाचताय.
4 / 7
प्रेक्षकाना खळखळून हसवणाऱ्या आणि कमी बजेटमध्ये बॉक्स ऑफिसवर मोठं यश मिळवणाऱ्या 'खोसला का घोसला'चा पुढील भाग लवकरच भेटीला येणार आहे
5 / 7
'खोसला का घोसला'मधील कलाकार रणवीर शोरेने याविषयी सांगितलं आहे. सध्या तरी सिनेमाच्या सीक्वलची तयारी प्राथमिक स्तरावर सुरु आहे
6 / 7
पहिल्या भागात खोसला कुटुंबाच्या मालकीची जमीन एक बिल्डर हडपतो. ती जमीन स्वतःची आहे असा दावा करत त्या जमिनीवर कब्जा करतो
7 / 7
पुढे खोसला कुटुंब स्वतःच्या मालकीची जमीन हुशारीने त्या बिल्डरकडून कशी मिळवतात याची रंजक कहाणी 'खोसला का घोसला'मध्ये बघायला मिळालेली. आता दुसऱ्या भागात काय असणार याची उत्सुकता आहे.
टॅग्स :अनुपम खेरबॉलिवूडरणवीर शौरीबोमन इराणी