'खुशाल' पाहा 'खुशाली'चे PHOTOS, जिच्या 'हॉटनेस'ची बॉलीवूडमध्येही जोरदार चर्चा! आहे तरी कोण?... By ऑनलाइन लोकमत | Published: December 25, 2022 1:50 PM1 / 15सोशल मीडियात सध्या अभिनेत्री खुशाली कुमारच्या हॉट फोटोंची जोरदार चर्चा आहे. या नवख्या अभिनेत्रीनं आपला पहिल्याच सिनेमातून सर्वांचं लक्ष वेधून घेतलं आहे.2 / 15खुशाली कुमारचा नेटफिल्सवर नुकताच 'धोखा - राऊंड डी कॉर्नर' सिनेमा प्रदर्शित झाला. तिच्या अभिनयाचं कौतुक झालं आणि तिच्या हॉटनेसची खूप चर्चा झाली. 3 / 15खुशाली 2015 मध्ये 'मैनु इश्क दा' या व्हिडीओ साँगमध्ये दिसली होती, यानंतर ती हायवे स्टार, रात कमल है, मेरे पापा, इक याद पुरानी या लोकप्रिय गाण्यांमध्ये दिसली.(Photo Instagram)4 / 15खुशाली कुमार टी-सीरीज ग्रुपचे संस्थापक गुलशन कुमार यांची मुलगी आहे आणि भूषण कुमारची बहीण आहे.5 / 15खुशाली कुमार अभिनेत्री तर आहेच पण ती एक उत्तम फॅशन डिझायनर देखील आहे. तिनं फॅशन डिझाइनिंगमध्ये शिक्षण घेतलं आहे. 6 / 15सध्या खुशालीची सोशल मीडियावर जोरदार चर्चा आहे. तिच्या हटके फोटोंनी लक्ष वेधून घेतलं आहे.7 / 15खुशालीला 'धोका- राऊंड द कॉर्नर' या सिनेमासाठी सत्यजित रे आयकन सिनेमा पुरस्कार (उत्कृष्ट नवोदित कलाकार) पुरस्कार देखील मिळाला आहे.8 / 15मूळातच स्वत: फॅशन डिझायनर असल्यानं खुशालीचा फॅशन सेन्स उत्तम आहे आणि त्याबाबत चाहतेही सोशल मीडियात तिचं कौतुक करत असतात.9 / 15सोशल मीडियात इन्स्टाग्रामवर तिचे ३ मिलियनहन अधिक फॉलोअर्स आहेत.10 / 15टी-सीरिजच्या गुलशन कुमार यांची मुलगी असल्यानं खुशालीनं सिनेमात पदार्पण करण्याआधी अनेक म्युझिक अल्बममध्ये काम केलं आहे.11 / 15'मेनू इश्क दा लगया रोग' गाण्यातून खुशालीनं आपल्या ग्लॅमरस अदांनी चाहत्यांना घायाळ केलं होतं.12 / 15'हायवे स्टार', 'रात कमाल है', 'मेरे पापा' , 'इक याद पुरानी' सारख्या लोकप्रिय गाण्यांमध्येही ती दिसली आहे. 13 / 15२०१८ मध्ये खुशालीनं काही शॉर्टफिल्ममध्येही काम केलं आहे. त्यापैकी 'जीना मुश्कील है यार' या शॉर्टफिल्मचा प्रीमियर यूके येथील 'फिल्म फेस्टिव्हल ऑफ लाइफ'मध्ये झाला होता.14 / 15खुशालीने तिचे दिवंगत वडील गुलशन कुमार यांना श्रद्धांजली म्हणून बहिण तुलसी कुमारने गायलेल्या गाण्यातही काम केलं होतं. 15 / 15खुशाली तिच्या हटके फॅशन डिझाइन्सनं सर्वांचं लक्ष वेधून घेत आली आहे. त्यामुळे तिच्या फॅशन स्टेटमेंटची चर्चा बॉलीवूडकरांमध्येही असते. आणखी वाचा Subscribe to Notifications