कियाराने असा साजरा केला सिद्धार्थ मल्होत्राचा वाढदिवस, 'सिड'चे चार्मिंग Photos पाहिले का!
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 17, 2025 14:57 IST
1 / 7तरुण, डायनॅमिक, चार्मिंग, हँडसम असं व्यक्तिमत्व असलेला अभिनेता सिद्धार्थ मल्होत्रा (Siddharth Malhotra). कालच त्याने ४० वा वाढदिवस साजरा केला.2 / 7नवऱ्याच्या वाढदिवसानिमित्त कियारा अडवाणीने (Kiara Advani) त्यांचे क्युट फोटो शेअर केलेत. स्पेशल पोस्ट लिहीत तिने त्याला वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत.3 / 7कियारा आणि सिद्धार्थ ज्या ज्या ठिकाणी फिरायला गेलेत तिथले हे फोटो आहेत. कियाराने या फोटोत सिद्धार्थला कॅप्चर केलं आहे. त्याचा हसरा चेहरा प्रेमात पाडणारा आहे.4 / 7तसंच तिने हा दोघांचा सेल्फी शेअर केला आहे. यात ते एकदम फ्रेश दिसत आहेत. दोघांनी व्हाईट आऊटफिटमध्ये ट्विनींग केलं आहे.5 / 7आणखी एका फोटोत दोघंही रोमँटिक झाले आहेत. कियारा सिद्धार्थच्या मिठीत असून कॅमेऱ्याकडे बघून हसत आहे. हिरव्या रंगाच्या गाऊनमध्ये ती सुंदर दिसत आहे. तर सिद्धार्थनेही हिरवा फ्लोरल शर्ट घातला आहे.6 / 7या फोटोत ते सायकल राईडवर गेले आहेत. सिद्धार्थला कियाराला जवळ घेत कपाळावर किस करताना दिसतोय. तर मागे परदेशातील उंच इमारत आहे. हा फोटो एकदम क्लासिक आला आहे.7 / 7कियाराने या फोटोंना 'हॅपी बर्थडे सोलमेट' असं कॅप्शन दिलं आहे. या फोटोंवर इतर सेलिब्रिटी आणि चाहत्यांनी लाईक्स आणि कमेंट्सही केल्या आहेत.