किशोर कुमार यांनी शेवटच्या दिवसात का दिली नाही मधुबालाची साथ? त्यांनीच सांगितलं होतं कारण... By ऑनलाइन लोकमत | Published: March 01, 2023 2:54 PM1 / 9बॉलिवूडमध्ये ‘द ब्यूटी ऑफ ट्रेजेडी क्वीन’ नावाने फेमस राहिलेल्या मधुबालाचं आयुष्य केवळ 36 वर्षांचं राहिलं. या 36 वर्षात तिने जीवनात खूप त्रास सहन केला आणि त्यानंतर जगाचा निरोप घेतला. मधुबालाचं खरं नाव मुमताज जहां देहलवी होतं. 2 / 99 वर्षांची असताना तिने सिनेमात काम सुरू केलं होतं. 1947 मध्ये आलेल्या नीलकमल सिनेमातून तिने मुख्य हिरोईनची भूमिका साकारली होती. त्यानंतर तिने कधी मागे वळून पाहिलं नाही.3 / 9यादरम्यान मधुबाला दिलीप कुमार यांच्या प्रेमात पडली. पण मधुबालाच्या वडिलांमुळे ते दोघे कधीच एक होऊ शकले नाहीत. त्याशिवाय मधुबालाचं नाव देव आनंद आणि इतरही काही लोकांसोबत जोडलं गेलं.4 / 9पण मधुबालाच्या नशीबात वेगळंच काही होतं. 1956 मध्ये तिने किशोर कुमारसोबत ‘ढाक के महल’ सिनेमा केला होता. सिनेमाच्या सेटवर त्यांची भेट झाली.5 / 9मधुबालाला तिच्या हृदयरोगाबाबत यावेळी समजलं होतं. किशोर कुमारला याबाबत माहीत असूनही त्यांनी मधुबालासोबत लग्न केलं. पण किशोरच्या पालकांना हे लग्न मान्य नव्हतं. कारण मधुबाला मुस्लिम होती. 6 / 9किशोर कुमार यांनी कुटुंबियांना विरोध करत 1960 मध्ये मधुबालासोबत लग्न केलं. मधुबाला त्यावेळी 27 वर्षांची होती. मधुबालाचा किशोर कुमार यांच्या पालकांनी कधीच सून म्हणून स्वीकार केला नाही. 7 / 9पण दोघेही आनंदाने जीवन जगत होते. किशोर यांनी मधुबालासाठी बांद्राच्या कार्टर रोडवर एक फ्लॅट खरेदी केला. लग्नानंतर मधुबालाचा आजार वाढला होता. किशोर यांनी तिच्या देखरेखीसाठी एक नर्सही ठेवली होती.8 / 9या फ्लॅटमध्ये मधुबाला एकटी राहत होती. किशोर कुमार तिला भेटण्यासाठी येत होते. मधुबालाचं आजारपण पाहता त्यांनी नंतर तिला भेटणं बंद केलं होतं. ते 2 महिन्यातून एकदा तिला भेटत होते. पण यावरून लोक वेगवेगळ्या चर्चा करू लागले होते.9 / 9नंतर किशोर कुमार यांनी स्पष्ट केलं होतं की, मधुबाला जेव्हाही त्यांना बघत होती तेव्हा ती रडत होती आणि रडणं तिच्या हेल्थसाठी चांगलं नव्हतं. त्यामुळे ते तिला महिन्यातून 2 किंवा 3 वेळा भेटत होते. मधुबालाच्या आजारामुळे तिचं 36 वयात निधन झालं. आणखी वाचा Subscribe to Notifications