KL Rahul-Athiya Shettyची लगीनघाई, लग्नानंतर हनिमूनला न जाण्याचा निर्णय, कारण आले समोर

By ऑनलाइन लोकमत | Published: January 23, 2023 04:43 PM2023-01-23T16:43:58+5:302023-01-23T16:47:35+5:30

KL Rahul-Athiya Shetty Wedding : अभिनेत्री अथिया शेट्टी आणि केएल राहुल यांचे खंडाळ्यातील सुनील शेट्टीच्या फार्म हाऊसवर लग्न होणार आहे. जिथे अनेक सेलेब्स हजेरी लावणार आहेत.

बॉलिवूड अभिनेता सुनील शेट्टीची मुलगी अथिया शेट्टी तिचा बॉयफ्रेंड क्रिकेटर केएल राहुलसोबत लग्न करणार आहे. अथिया शेट्टी आणि केएल राहुलचा ग्रँड वेडिंग २३ जानेवारीला होणार आहे.

अभिनेत्री अथिया शेट्टी आणि केएल राहुल यांचे खंडाळ्यातील फिल्मस्टार सुनील शेट्टीच्या फार्म हाऊसवर लग्न होणार आहे. जिथे अनेक सेलेब्स हजेरी लावणार आहेत.

या लग्नात क्रिकेटपासून ते चित्रपट जगतातील अनेक स्टार्स सहभागी होणार आहेत. अशा स्थितीत या दोघांच्या लग्नाची जोरदार चर्चा रंगली आहे.

दरम्यान आता अशी बातमी समोर आली आहे की लग्नानंतर लवकरच हे जोडपे हनीमूनला जाऊ शकणार नाहीत.

मीडिया रिपोर्ट्सनुसार, अथिया शेट्टी आणि केएल राहुल लग्नानंतर लगेचच हनीमूनला जाणार नाहीत. कामाच्या कमिटमेंटमुळे दोघेही काही दिवसांनी हनिमूनला जाणार आहेत.

के एल राहुल त्याच्या पुढच्या टूर्नामेंटसाठी टीम इंडियामध्ये सामील होणार असल्याचं बोलले जात आहे. तर, अथिया स्वतःच्या वेंचरमध्ये व्यस्त आहे. जी ती लवकरच लॉन्च करणार आहे. अशा परिस्थितीत हे जोडपे लग्नानंतर लगेचच हनिमूनला जाऊ शकणार नाहीत.

त्यांच्या कामाच्या कमिटमेंट्स पूर्ण केल्यानंतर, स्टार कपल हनीमूनची योजना आखणार आहे. बॉलिवूड स्टार्स अनुष्का शर्मा आणि विराट कोहली यांच्याप्रमाणे हे दोघेही हनिमूनसाठी युरोप टूरला रवाना होणार असल्याचं ऐकिवात आहे. जिथे दोघेही फिनलंडमध्ये दर्जेदार वेळ घालवतील.

याशिवाय दोघेही फ्रान्समधील सिटी ऑफ लव्ह म्हणजेच पॅरिसला पोहोचतील. मात्र, त्याची अधिकृत माहिती अद्याप समोर आलेली नाही.

या सुंदर लोकेशन्सला हे स्टार कपल हनीमूनसाठी रवाना होऊ शकते, अशा बातम्या येत आहेत.