IN PICS : ती ‘लाल दुप्पटेवाली’ हिरोईन आता कशी दिसते बघा, 29 वर्षांत इतका बदलला लुक By ऑनलाइन लोकमत | Published: March 24, 2022 2:10 PM1 / 890 च्या दशकातील ‘लाल दुप्पटेवाली...’ हे बॉलिवूड सॉन्ग तुम्हाला आठवत असेलच. यात गोविंदाची हिरोईन होती रितू शिवपुरी. ही रितू आज बॉलिवूडमधून गायब झालीये. ती आता कुठे आहे, काय करते, कशी दिसते, हे जाणून घेण्याची उत्सुकता तुम्हालाही असेलच.2 / 8 गोविंदासोबतचा ‘आंखें’ हा रितूचा पहिला सिनेमा. 1993 साली रिलीज झालेल्या या सिनेमानंतर रितुचा एकही सिनेमा कमाल दाखवू शकला नाही. 2006 पर्यंत रितूने बॉलिवूडमध्ये नशीब आजमावलं. 3 / 8पण यश मिळत नाही म्हटल्यावर ती बॉलिवूडमधून बाहेर पडली. आजारी पतीसाठी तिने करिअर सोडलं. आँखे चित्रपटानंतर रितु शिवपुरीने ब-याच चित्रपटात काम केले. हम सब चोर हैं, आर या पार, भाई भाई, हद कर दी आपने, लज्जा, शक्ति: द पावर व ऐलान या सिनेमात ती दिसली.4 / 8रितु ही अभिनेता ओम व सुधा शिवपुरी यांची मुलगी. हरी व्यंकटसोबत रितुने लग्न केलं. तिला तीन मुलं आहेत. रितुचे आईवडील आधीच बॉलिवूडमध्ये सक्रिय होते. त्यामुळे इंडस्ट्री म्हणजे तिच्यासाठी दुसरं घर होतं. 5 / 8शिक्षण पूर्ण झाल्यावर रितूनं मॉडेलिंग सुरु केलं. याचदरम्यान एक दिवस पहलाज निहलाली यांनी तिला पाहिलं आणि ‘आंखें’ हा सिनेमा तिला आॅफर केला. यावेळी ती 17 वर्षांची होती.6 / 8 2006 मध्ये बॉलिवूड सोडल्यानंतर रितूने छोट्या पडद्यावर नशीब आजमावण्याचे प्रयत्न केलेत. एका टीव्ही शोमध्ये ती दिसली. पण यासाठी तिला 18 ते 20 तास काम करावं लागायचं. ती कामावरून घरी परतायची तेव्हा पती झोपलेला असायचा. करिअरच्या नादात रितूचं कुटुंबाकडे दुर्लक्ष होऊ लागलं होते. अखेर रितुने अॅक्टिंगला कायमचा रामराम ठोकण्याचा निर्णय घेतला.7 / 8 यानंतर काही वर्षांनी पुन्हा तिने बॉलिवूडमध्ये परतण्याचा प्रयत्न केला. मात्र यावेळी तिच्या पतीचे आजारपण आडवं आलं. होय, पतीच्या पाठीत ट्युमर झाल्याचं निदान झालं आणि त्याच्यासाठी रितूने करिअरवर पाणी सोडलं. करिअरपेक्षा पतीचं आयुष्य महत्त्वाचं आहे, असा विचार करून तिने कमबॅकचा विचार सोडून दिला. 8 / 8अर्थात मुलं मोठी झाल्यावर 2016 साली अनिल कपूरच्या ‘24’ या शोमधून तिने वापसी केली.रितूने बॉलिवूडमधून ब्रेक घेतल्यानंतर ज्वेलरी डिझायनर म्हणून काम केलं. आणखी वाचा Subscribe to Notifications