Photos : कोण आहे ‘KGF 2’ सुपरस्टार यशची पत्नी, दिसते फारच सुंदर By ऑनलाइन लोकमत | Published: March 07, 2022 11:13 AM1 / 12मिलेनियल अँग्री मॅन म्हणून ओळखला जाणारा कन्नड सुपरस्टार यश याला आज कोण ओळखत नाही. ‘केजीएफ 1’ नंतर यश चाहत्यांच्या गळ्यातील ताईत बनला आहे. शिवाय लवकरच त्याचा ‘केजीएफ 2’ हा सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीस येतो आहे.2 / 12आज यश साऊथचा सुपरस्टार आहे. जगभरात त्याचे चाहते आहेत. पण यशचे वडील आजही बस चालवतात. कदाचित त्याचमुळे यशचे पाय आजही जमिनीवर आहेत. पण आज आम्ही त्याच्याबद्दल नाही तर त्याच्या बायकोबद्दल सांगणार आहोत.3 / 12होय, यशची पत्नी राधिका पंडित आज तिचा वाढदिवस साजरा करतेय. यशने बायकोला वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. चाहत्यांनीही तिच्यावर शुभेच्छांचा वर्षाव चालवला आहे.4 / 12यशची पत्नी राधिका पंडित कोण आहे, हे आज आम्ही तुम्हाला सांगणार आहोत. तर राधिका ही सुद्धा कन्नड सिनेसृष्टीतील लोकप्रिय अभिनेत्री आहे.5 / 127 मार्च 1984 रोजी बेंगळुरूमध्ये जन्मलेल्या राधिकाचे वडील कृष्णा पंडित सारस्वत हेही कन्नड चित्रपटसृष्टीतील मोठ्ठ नाव आहे. राधिकाने बेंगळुरूत शालेय शिक्षण पूर्ण केलं.6 / 12यानंतर बेंगळुरूच्या माऊंट कार्मेल कॉलेजातून तिने बी कॉम केलं. मास्टर ऑफ बिझनेस अॅडमिनिस्ट्रेशन पूर्ण केल्यानंतर राधिका टीचर बनण्याचं स्वप्न पाहू लागली होती. पण कदाचित तिच्या नशीबात अभिनेत्री बनणं लिहिलं होतं.7 / 122007 साली बी कॉमच्या फायनल इअरमध्ये असतानाच एका मित्राने तिला कन्नड टीव्ही शोसाठी ऑडिशनसाठी बोलवलं. पण नशीब इतकं जोरदार की, ऑडिशन न देताच राधिका या शोसाठी सिलेक्ट झाली.8 / 12यानंतर आणखी एका टीव्ही शोमध्ये तिला संधी मिळाली. मॅगझिनमध्ये राधिकाचे फोटो झळकू लागले. अशात एकदिवस दिग्दर्शक शशांक यांची नजर तिच्या या फोटोंवर पडली.9 / 12शशांक त्यावेळी 18th Cross आणि Moggina Manasu या चित्रपटांसाठी अभिनेत्रीच्या शोधात होते. या दोन्ही सिनेमासाठी राधिकाला साईन करण्यात आलं. Moggina Manasu या चित्रपटातील राधिकाचं काम सर्वांनाच खूप आवडलं.10 / 122007 मध्येच राधिका व यशची पहिली भेट झाली होती. दोघांनीही Nandagokula या मालिकेत एकत्र काम केलं होतं.Moggina Manasu या चित्रपटातही दोघं होते. त्यांच्यात मैत्री झाली आणि मग दोघंही एकमेकांच्या प्रेमात पडले. पण त्यांनी आपलं नातं जगापासून लपवून ठेवलं.11 / 122016 साली दोघांनी साखरपुडा केला आणि याचवर्षी डिसेंबरमध्ये दोघांचं लग्न झालं. 2018 मध्ये दोघांना कन्यारत्न झालं आणि 2019 मध्ये त्यांच्या मुलाचा जन्म झाला.12 / 12यशसोबत लग्न झाल्यानंतर राधिकाने काही काळ चित्रपटांतून ब्रेक घेतला होता. सध्या ती यशच्या Yasho Marga Foundation या फाऊंडेशनचं काम बघते. ही फाऊंडेशन शेतकरी आणि मजूरांसाठी काम करते. आणखी वाचा Subscribe to Notifications