Join us

सुशांतच्या केसनंतर चर्चेत आलेल्या संदीप सिंहची A to Z माहिती, आयस्क्रीम विकणारा कसा बनला प्रोड्युसर

By ऑनलाइन लोकमत | Published: August 26, 2020 3:03 PM

1 / 16
सुशांत सिंह राजपूतच्या मृत्यूनंतर अचानक संदीप सिंह हे नाव फारच चर्चेत आलं. पण संदीप सिंह कोण आहे हे फारच कमी लोकांना माहीत आहे. सुशांतच्या मृत्यूनंतर संदीप सिंह हाच त्याच्या अंत्यसंस्कारावेळी आणि कूपर हॉस्पिटलमध्ये फोटोंमध्ये दिसला होता. अंकिता लोखंडेच्या घरी पोलीस पोहोचले तेव्हाही संदीप अंकितासोबत दिसला होता. तो सुशांतचा जवळचा मित्र असल्याचा त्याने दावा केला होता. पण आता संदीप सिंह हा सुशांतसोबतच्या नात्यामुळे आणि त्याच्या मृत्यूदरम्यान सगळीकडे उपस्थित असल्याने त्याच्याबाबत काही प्रश्न उपस्थित होत आहे. (All Photo Credit : Sandip Singh Social Media)
2 / 16
कोण आहे हा संदीप सिंह? कॉल डिटेल्सनुसार त्याने वर्षभर सुशांतला फोनही केला नाही. तरी सर्व कामांमध्ये तोच पुढे होता. एक आयस्क्रीम विकणारा संजय लीला भन्साळी यांचा विश्वासू कसा झाला? एका रेडिओ स्टेशनवर काम करणाऱ्याने पंतप्रधान नरेंद्र मोदीवर सिनेमा कसा बनवला? इतकेच नाही तर मॉरिशसमधील एक सेक्स स्कॅंडलमध्येही त्याचं नाव आलं होतं. अशाच त्याच्या काही गोष्टी जाणून घेऊ...
3 / 16
संदीप हा मुळचा बिहारच्या मुजफ्फरपूरचा आहे. पण मुंबईतील मीरा रोडमध्ये मध्यमवर्गीय कुटूंबात वाढलाय. संदीपच्या परिवारात त्याची आई आणि बहीण आहे. संदीप शिक्षण घेत असताना मुंबईच्या मरीन ड्राइव्ह भागात आयस्क्रीम विकत होता आणि ट्यूशन घेऊन शिक्षण पूर्ण करत होता.
4 / 16
इतकेच नाही तर संदीपने छोट्या-मोठ्या मॅगझिन आणि मीडिया संस्थांमध्ये कामही केलं आहे. संदीप हा बोलण्यात पटाईत आणि जुगाडू पद्धतीचा माणूस आहे. लोकांसोबत गोड बोलण्यात तो तरबेज मानला जातो. संदीपने रेडिओ स्टेशनमध्ये काम करायला सुरूवात केल्यावर त्याला यश मिळू लागलं होतं.
5 / 16
6 / 16
मुंबईत रेडिओ स्टेशनववर काम करत असताना त्याने अनेक मोठ्या कलाकारांसोबत मैत्री केली. असंच एक मोठं नाव म्हणजे संजय लीला भन्साळी. 'सांवरिया' सिनेमापासून दोघे सोबत आले. आणि नंतर तो त्यांचा खास दोस्त आणि विश्वासू झाला. संजय लीला भन्साळीने संदीपला त्यांच्या कंपनीचा सीईओ सुद्धा बनवलं.
7 / 16
संदीपने यादरम्यान ६ सिनेमे आणि टीव्ही मालिका तयार केली. हे सिनेमे होते शिरीन फरहाद की लव्हस्टोरी, रामलीला, राउडी राठोड, गब्बर इज बॅक आणि मेरी कॉम. यादरम्यान संदीपने स्टार प्लसवर सरस्वती चंद्र मालिकेची संजय लीला भन्साळीसोबत निर्मितीही केली.
8 / 16
२०१५ मध्ये संदीपने भन्साळी यांची कंपनी सोडली आणि स्वत:च निर्माता झाला. त्याने लीजेंड ग्लोबल स्टुडिओ नावाची कंपनी सुरू केली. या बॅनरखाली त्याने अलीगढ, भूमि, सरबजीत आणि PM नरेंद्र मोदी सारखे सिनेमे बनवले.
9 / 16
मीडिया रिपोर्ट्सनुसार २०१८ मध्ये संदीप सिंहचं नाव एका सेक्स स्कॅंडलमध्येही आलं होतं. मॉरिशसमध्ये स्वित्झर्लॅंडच्या एका अल्पवयीन मुलासोबत शारीरिक संबंध ठेवण्याचा त्याच्यावर आरोप लागला होता.
10 / 16
संदीप हा सुशांत सिंह राजपूत आणि अंकिता लोखंडेचा मित्र होता. दोघे वेगळे झाल्यावर संदीप अंकितासोबत दिसला. पण सुशांतसोबत दिसला नाही. नुकताच सुशांतच्या मृत्यूनंतर त्याने सांगितले की तो सुशांतचा मित्र आहे. अंत्यसंस्कारावेळीही तोच कामे करत होता. नंतर सुशांतच्या बहिणीसोबतही तो दिसला. पण सुशांतच्या परिवाराने आम्ही त्याला ओळखत नाही, असा खुलासा केला.
11 / 16
नुकतीच अशी बातमी समोर आली की, संदीपने सप्टेंबर २०१९ पासून सुशांतला कधीच कॉल केला नाही. सोबतच असेही समोर आले की, संदीप सुशांतला घेऊन एक सिनेमाही प्लॅन करत होता. कारण संदीपही बिहारमधून आहे. तो सुशांतला त्याचा बिहारी भाऊ म्हणायचा.
12 / 16
संदीप निर्माता असण्यासोबतच बॉलिवूडच्या अनेक स्टारचा मित्र आहे. संजय दत्तपासून ते शाहरूख खानपर्यंत आणि विवेक ओबेरॉयपासून ते अंकिता लोखंडेपर्यंत त्याचे मित्र आहे. संदीपच्या सोशल मीडिया अकाऊंटवर या स्टार्ससोबतचे त्याचे फोटोही आहेत.
13 / 16
२०१९ मध्ये लोकसभा निवडणुकीवेळी संदीपने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर सिनेमा बनवला होता. हा सिनेमा फार वादात सापडला होता. ज्यात विवेक ओबेरॉयने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भूमिका साकारली होती. या सिनेमात संदीपने एक गाणंही गायलं होतं.
14 / 16
संदीपने सुशांतच्या अंत्यसंस्काराचं सगळं आयोजन केलं होतं. इतकेच काय तर सुशांतच्या मृत्यूच्या दिवशी संदीनेच फोन करून अॅम्बुलन्सला बोलवलं होतं. असेही सांगितले जात आहे की, सुशांतच्या मृत्यूनंतर सर्वातआधी पोहोचणाऱ्यांपैकी संदीप एक होता.
15 / 16
संदीप आणि त्याच्या टीमनेच महेश शेट्टी आणि सुशांतच्या परिवाराला आणण्याचं काम केलं होतं. संदीपनेच सगळी कामे केली, पण सुशांतचा परिवार त्याला ओखळत नव्हता.
16 / 16
संदीप सिंहच्या दुबई दोऱ्यांनाही सुशांतच्या मृत्यूसोबत जोडून बघितलं जात आहे. भारतीय जनता पार्टीचे नेते सुब्रमण्यम स्वामी यानीच संदीपच्या दुबई कनेक्शनबाबत ट्विटरवरून माहिती दिली होती. त्यांना संदीपला संशयित म्हटलं होतं. आता सीबीआय त्याची चौकशी करू शकते. आता तर सोशल मीडियात अशीही बातमी व्हायरल झाली आहे की, संदीप देश सोडण्यासाठी तयार आहे.
टॅग्स :बॉलिवूडसुशांत सिंग रजपूत