लग्नानंतर मालामाल होणार विकी कौशल...; कतरिना कैफची संपत्ती बघून डोळे पांढरे होतील!! By ऑनलाइन लोकमत | Published: November 14, 2021 12:44 PM1 / 8बॉलिवूडची बहुचर्चित जोडी विकी कौशल व कतरिना कैफ लवकरच लग्नबंधनात अडकणार आहेत. या शाही विवाहसोहळ्याची तयारी जोरात सुरू आहेत. पण आज आम्ही कॅट व विकीच्या लग्नाबद्दल नाही तर त्यांच्या संपत्तीबद्दल सांगणार आहोत.2 / 8होय, लग्नानंतर कॅट व विकी दोघंही मालामाल होणार आहेत. तुम्हाला ठाऊक आहेच की, कतरिना ही बॉलिवूडची हायेस्ट पेड अभिनेत्री आहे. पाच वेळा ती ‘वर्ल्ड मोस्ट सेक्सिएस्ट वूमन’ राहिली आहे.3 / 82019 मध्ये कॅट 100 सर्वाधिक कमाई करणा-या अभिनेत्रींच्या यादीत 23 व्या स्थानी होती. रिपोर्टनुसार, कतरिनाची नेटवर्थ सुमारे 220 कोटी आहे.4 / 8कतरिना वर्षाला सुमारे 23.64 कोटी रूपये कमावते. एका जाहिरातीसाठी ती 6 ते 7 कोटी रूपये घेते आणि एका चित्रपटासाठी 11 कोटींचे मानधन घेते.5 / 8कतरिनाचा होणारा पती विकी कौशल हा सुद्धा 2019 च्या फोर्ब्स इंडिया सेलिब्रिटींच्या यादीत सामील होता. रिपोर्टनुसार, त्याची एकूण नेटवर्थ 3 मिलियन डॉलर आहे. म्हणजे सुमारे 22 कोटी.6 / 8विकी कौशल दरवर्षी 3 कोटी रूपये कमावतो. एका सिनेमासाठी तो 3 ते 4 कोटी रूपये घेतो.7 / 8कतरिना लक्झरी लाईफ जगते. मुंबईतचं नाही तर विदेशातही तिची प्रॉपर्टी आहे. वांद्रे भागात तिचे 8 कोटींचं अपार्टमेंट आहे. लोखंडवालामध्ये 17 कोटींचं अपार्टमेंट आहे. एका पेंटहाऊसची ती मालकीन आहे. लंडनमध्येही तिचा बंगला आहे.8 / 8रेंज रोवर, मर्सिडीज बेंज, ऑडी क्यू 7, ऑडी क्यू 3 अशा अलिशान गाड्यांमधून ती फिरते. विकीने अलीकडे रेंज रोव्हर गाडी खरेदी केली आहे. त्याच्याकडे मर्सिडीज बेंज जीएलसी एसयूव्ही कार आहे. आणखी वाचा Subscribe to Notifications