अभय देओलच्या आयुष्यातील ‘ती’ कोण? जाणून घ्या कोण आहे शिलो शिव सुलेमान By ऑनलाइन लोकमत | Published: September 28, 2021 2:40 PM1 / 9अभय देओल तसा आपल्याच कोशात राहणारा अभिनेता. सोशल मीडियावर तो अगदी निवडक पोस्ट टाकतो. पण तूर्तास त्याने शेअर केलेले फोटो पाहून सगळ्यांच्याच भुवया उंचावल्या आहेत. 2 / 9होय, अभयने शिलो शिव सुलेमानसोबतचे काही फोटो शेअर केले आहेत. हे रोमॅन्टिक फोटो पाहून अभयच्या लाईफमध्ये शिलो शिव सुलेमान हिची एन्ट्री झाल्याचं मानलं जातेय. 3 / 9आता ही शिलो शिव सुलेमान आहे तरी कोण? असा प्रश्न तुम्हालाही पडला असेलच.4 / 9तर ही शिलो हिचा अॅक्टिंगच्या दुनियेशी काहीही संबंध नाही. ती एक कन्टेम्पररी आर्टिस्ट आहे. 5 / 9 32 वर्षाच्या शिलो शिव सुलेमानला तिच्या इलस्ट्रेशन व इन्स्टॉलेशन आर्टसाठी ओळखले जाते. कर्नाटकच्या बेंगळुरू येथे जन्मलेली शिलो अतिशय बिनधास्त आयुष्य जगते.6 / 9तिची आई नीलोफर सुलेमान ही खूप प्रसिद्ध चित्रकार आहे. आईच्या पावलावर पाऊल ठेवत शिलो शिव सुलेमानही रंगांच्या दुनियेत रंगली.7 / 9वयाच्या 16 व्या वर्षी तिने पुस्तकाची इलेस्ट्रेशन बनवून कलेच्या दुनियेत एन्ट्री घेतली होती.8 / 9शिलो ही कला सामूहिक निर्भय सामूहिक संस्थापक आणि संचालक आहेत. या अंतर्गत 400 कलाकार काम करत आहेत जे लैंगिक हिंसाचाराचा निषेध करण्यासाठी कलेचा वापर करतात. 9 / 9शिलोला भटकंतीची प्रचंड आवड आहे. बिनधास्त जगणारी, बिनधास्त वागणारी, सोशल मुद्यांवर परखड मत मांडणा-या शिलोचे अभयशी काय नाते आहे, हे अद्याप स्पष्ट झालेले नाही. पण चर्चा जोरात आहे. आणखी वाचा Subscribe to Notifications