कोट्यावधी रूपयांच्या संपत्तीचा मालक आहे हनी सिंह, एका गाण्यासाठी घेतो इतकी रक्कम! By ऑनलाइन लोकमत | Published: August 04, 2021 1:55 PM1 / 10हाय हिल्स, अंग्रेजी बीटसारख्या एकापेक्षा एक गाण्याने फॅन्समद्ये गायक हनी सिंहची जोरदार चर्चा आहे. हनी सिंहवर कौटुंबीक हिंसाचाराचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 2 / 10हनी सिंहची पत्नी शालिनी तलवारने त्याच्यावर हिंसेचा आरोप केला आहे. आज तो पत्नीने केलेल्या हिंसाचाराच्या आरोपामुळे चर्चेत असेल. पण तो एक असा रॅपर आहे जो नेहमीच फॅन्सच्या मनात घर करून आहे.3 / 10हनी सिंहचं खरं नाव हिरदेश सिंह आहे. स्टेजवर परफॉर्म करताना त्याने त्याचं नाव हनी सिंह असं ठेवलं. 4 / 10हनी सिंहने त्याच्या करिअरची सुरूवात यूट्यूब व्हिडीओच्या माध्यमातून केली होती. आज लाखो फॅन्सच्या मनात घर करून असलेला हनी सिंह कोट्यावधी रूपयांच्या संपत्तीचा मालक आहे. 5 / 10हनी सिंह या भारतातील सर्वात श्रीमंत रॅपर मानला जातो. मीडिया रिपोर्टनुसार हनी सिंह साधारण १७३ कोटी रूपयांच्या संपत्तीचा मालक आहे. 6 / 10इतकंच नाही तर मीडिया रिपोर्टमद्ये सांगण्यात आलं आहे की, रॅपर हनी सिंह दरवर्षी साधारण ४२ कोटी रूपयांच्या आसपास कमाई करतो. हनी सिंहकडे २५ मिलियन यूएस डॉलरची संपत्ती आहे. भारतीय करन्सीनुसार ही रक्कम १७३ कोटी रूपयांच्या आसपास होते.7 / 10हनी सिंहची अर्धी कमाई त्याच्या गायनातून होते. हनी सिंह एक गाणं गाण्यासाठी १५ लाख रूपये घेतो. हनीच्या संपत्तीत दिवसेंदिवस वाढ होत आहे. इतकंच नाही तर हनी सिंह देशातील सर्वात जास्त टॅक्स भरणाऱ्या लोकांपैकी एक आहे.8 / 10हनी सिंहला गाड्यांची फार आवड आहे. हेच कारण आहे की, त्याच्या गाण्यांमध्ये स्टायलिश कार दाखवल्या जातात. त्याच्या वेगवेगळ्या कार आहेत. मीडिया रिपोर्टनुसार त्याच्याकडे ऑडी क्यू 7, ऑडी आर8, जेगुआर,रोल्स, बीएमडब्ल्यू या कार आहेत.9 / 10हनी सिंहकडे देशातील वेगवेगळ्या भागात घर आहे. नोएडामध्ये त्याने नुकतंच एक घर खरेदी केलं. त्यासोबत पंजाबमध्ये ३ कोटी रूपयांचं घर आहे. तर गुडगांव, दिल्ली आणि मुंबईतही त्याचे आलिशान घरे आहेत.10 / 10 आणखी वाचा Subscribe to Notifications