Join us

Kriti Sanon, Prabhas : “पब्लिक या गोष्टी..”, प्रभाससोबतच्या साखरपुड्याच्या चर्चांवर अखेर क्रितीनं सोडलं मौन

By ऑनलाइन लोकमत | Published: February 19, 2023 2:04 PM

1 / 10
साऊथचा सुपरस्टार प्रभास ( Prabhas) आणि बॉलिवूड अभिनेत्री क्रिती सॅनन (Kriti Sanon) दोघंही गेल्या अनेक दिवसांपासून चर्चेत आहे.
2 / 10
होय, प्रभास व क्रिती एकमेकांना डेट करत असल्याची चर्चा आहे. मध्यंतरी त्यांच्या साखरपुड्याच्याही चर्चा रंगल्या होत्या. दोघं लवकरच साखरपुडा करणार असल्याचं म्हटलं गेलं होतं.
3 / 10
मालदीवमध्ये प्रभास व क्रिती दोघंही साखरपुडा करणार असल्याचा दावा विदेशी सेन्सॉर बोर्डाचे सदस्य उमेर संधू यांनी आपल्या ट्विटमध्ये केला होता.
4 / 10
क्रिती यावर काहीही बोलली नव्हती. पण आता तिने यावर भाष्य केलं आहे. मला अशा गोष्टींवर प्रतिक्रिया द्यायला आवडत नाही, असं तिने म्हटलं आहे.
5 / 10
पब्लिक अशा गोष्टी लक्षात नाही ठेवत. या गोष्टींची चर्चा होते. पण हळूहळू पब्लिक सगळं विसरते. हळूहळू सगळ्या चर्चा हवेत विरतील, असंही ती म्हणाली.
6 / 10
बोललं की, अशा अफवांना आणखी बळ मिळतं. त्यापेक्षा यावर न बोललेलं बरं. मी यावर जाणीवपूर्वक बोलणं टाळते, असंही ती म्हणाली.
7 / 10
जेव्हा मला वाटतं की या सगळ्याचा परिणाम माझ्या कुटुंबियांवर होत आहे किंवा एखादी गोष्ट आता मर्यादेपलिकडे जात आहे आणि माझ्या सन्मान, प्रतिमेला धक्का बसत आहे. तेव्हाच मी या सगळ्या गोष्टींवर प्रतिक्रिया देते, असंही तिने स्पष्ट केलं.
8 / 10
सध्या क्रितीचा शहजादा हा सिनेमा नुकताच प्रदर्शित झाला आहे. या सिनेमात क्रिती कार्तिक आर्यनसोबत झळकली आहे.
9 / 10
येत्या काही दिवसांत ती प्रभाससोबत आदिपुरुषमध्ये दिसणार आहे. ओम राऊत दिग्दर्शित या चित्रपटात सैफ अली खान आणि सनी सिंग देखील काम करत आहेत.
10 / 10
शहजादाच्या आधी क्रिती वरुण धवनच्या बरोबर भेडियामध्ये दिसली होती आणि हा चित्रपट हिट ठरला होता.
टॅग्स :क्रिती सनॉनप्रभास