Join us

मिस्टर परफेक्ट! संस्कारी, हँडसम पतीच्या शोधात आहेत बॉलिवूडच्या 'या' सौंदर्यवती

By ऑनलाइन लोकमत | Published: June 27, 2023 1:06 PM

1 / 10
आलिया भट्ट, कियारा अडवाणी, सोनाली सहगल यांच्यासह अनेक बॉलिवूड सौंदर्यवतींनी लग्नगाठ बांधली आहे. पण, इंडस्ट्रीत अजूनही काही अभिनेत्री आहेत, ज्यांनी अद्याप लग्नगाठ बांधलेली नाही. यांचे चाहते मात्र त्या कधी लग्न करणार आहे हे जाणून घेण्यासाठी उत्सुक आहेत. काही अभिनेत्रींना त्यांचा मिस्टर परफेक्ट अजून मिळाला नाही.
2 / 10
बॉलिवूडमधील फिट अभिनेत्रींपैकी एक असलेल्या दिशा पाटनीने अद्याप लग्न केलं नाही आणि ती लग्नाच्या मूडमध्येही दिसत नाही. टायगर श्रॉफसोबतच्या ब्रेकअपनंतर ही अभिनेत्री सिंगल आहे.
3 / 10
अलीकडच्या काळात अभिनेत्री भूमी पेडणेकरच्या लग्नाची फारशी चर्चा नाही. अभिनेत्री अजूनही सिंगल असल्याचं सांगण्यात येत आहे. म्हणजेच तिला तिचा मिस्टर परफेक्ट अजून सापडलेला नाही.
4 / 10
'आदिपुरुष'साठी प्रसिद्धीझोतात आलेली क्रिती सेनन अजूनही सिंगल आहे. मध्यंतरी ती प्रभासला डेट करत असल्याच्या बातम्या आल्या होत्या, मात्र अभिनेत्रीने या वृत्तांवर कोणतीही प्रतिक्रिया दिली नाही.
5 / 10
बॉलिवूड अभिनेत्री नुसरत भरुचा अजूनही सिंगल आहे आणि तिच्या डेटींगबद्दल आतापर्यंत कोणतीही बातमी समोर आलेली नाही.
6 / 10
नात्यामुळे वादात सापडलेली अभिनेत्री जॅकलीन फर्नांडिस सध्या सिंगल असल्याचं समोर येत आहे. तिच्या लव्ह लाईफबद्दल आता नवीन अपडेट आलेली नाही.
7 / 10
खामोश गर्ल सोनाक्षी सिन्हा आणि अभिनेता झहीर इक्बालसोबतच्या नात्याची अनेकदा चर्चा होते. पण सोनाक्षीने अद्याप तिच्या नात्याला दुजोरा दिलेला नाही. सध्या तिच्या लग्नाची कोणतीही चर्चा नाही.
8 / 10
बॉलिवूडची क्वीन कंगना राणौतने तिच्या रिलेशनशिपबाबत इंडस्ट्रीशी पंगा घेतला आहे. एकेकाळी हृतिक रोशनसोबत रिलेशनशिपमध्ये असल्याचा दावा करणारी कंगना आता सिंगल आहे.
9 / 10
अभिनेत्री श्रद्धा कपूर काही काळापूर्वी फोटोग्राफर रोहन श्रेष्ठसोबतच्या नात्यामुळे प्रसिद्धीच्या झोतात होती, पण आता दोघेही वेगळे झाले आहेत आणि सध्या अभिनेत्रीच्या आयुष्यात कोणी खास व्यक्ती नाही.
10 / 10
अभिनेत्री तापसी पन्नू देखील मिस्टर परफेक्टच्या शोधात आहे, जो तिला अद्याप सापडलेला नाही. अभिनेत्रीला Husband मटेरियल मुलगा हवा आहे. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.
टॅग्स :बॉलिवूड