1 / 9भोजपुरी आणि हिंदी सिनेमातील प्रसिद्ध अभिनेता रवी किशन अभिनय आणि राजकारणातील प्रसिद्ध चेहरा बनले आहेत. त्यांच्याबाबत रोज नवनव्या बातम्या समोर येत असतात. आज आम्ही तुम्हाला रवी किशन यांची मुलगी रीवा किशन हिच्याबद्दल सांगणार आहोत. 2 / 9रवी किशन यांच्याप्रमाणेच त्यांची मुलगी रीवा किशन अभिनयाच्या दुनियेत आपलं नाव कमाऊ इच्छिते. आपण अभिनेत्री व्हायचं हे रीवानं लहानपणीच ठरवलं होतं. त्यानंतर तिने नसिरुद्दीन शाह यांच्या अॅक्टिंग प्ले ग्रुपमध्ये प्रवेश घेतला होता. 3 / 9अभिनय क्षेत्रात आल्यावर कुठलीही त्रुटी राहू नये यासाठी तिने अभिनय आणि फिल्म मेकिंगमध्ये ग्रॅज्युएशन केलं आहे. 4 / 9रीवा काही काळासाठी अमेरिकेतही गेली होती. अभिनयाबरोबरच तिने नृत्यामध्येही प्राविण्य मिळवलं आहे. ती सोशल मीडियावर नेहमीच डान्सचे व्हि़डीओ शेअर करत असते. 5 / 9रीवा हिने सब कुशल मंगल या चित्रपटामधून पदार्पण केले होते. मात्र हा चित्रपट फारसा यशस्वी ठरला नव्हता. मात्र रीवा यश मिळवण्यासाठी प्रयत्नशील आहे. 6 / 9अभिनयाच्या दुनियेत यशस्वी होण्यासाठी इंटरनेटवर सक्रीय राहिलं पाहिजे, हे रीवाला माहिती आहे. ती सोशल मीडियावर अनेक ग्लॅमरस फोटो पोस्ट करत असते. 7 / 9 तिच्या इन्स्टाग्राम अकाउंटवर पाहिल्यावर ती तिच्य वडिलांप्रमाणे इंडस्ट्रीमध्ये कमाल करण्यासाठी तयार आहे, हे दिसून येतं. 8 / 9आता ती तिच्या वडिलांप्रमाणेच चित्रपट क्षेत्रात यशस्वी ठरेल, अशी अपेक्षा आहे.9 / 9