'शोले'मधला सूरमा भोपाली आठवतोय? होणाऱ्या सूनेच्या बहिणीशीच केलं होतं तिसरं लग्न; अजब आहे किस्सा By ऑनलाइन लोकमत | Published: March 29, 2023 9:29 AM1 / 7दिवंगत बॉलिवूड अभिनेते जगदीप (Jagdeep) ज्यांना सर्वच 'सूरमा भोपाली' नावे ओळखतात. जगदीप यांचा जन्मदिवस. 'शोले' या आयकॉनिक सिनेमात त्यांनी साकारलेली 'सूरमा भोपाली' ही भूमिका प्रत्येकाच्याच लक्षात आहे. त्यांचं पूर्ण नाव सैय्यद इश्तियाक जाफरी असं होतं. ४०० पेक्षा जास्त सिनेमात त्यांनी भूमिका केल्या. 2 / 7जगदीप यांनी बी आर चोपडा यांच्या 'अफसाना' या सिनेमातून बालकलाकाराची भूमिका साकारत अभिनय क्षेत्रात पदार्पण केलं होतं. १९४७ मध्ये झालेल्या फाळणीत त्यांच्या वडिलांचं निधन झालं. यानंतर त्यांनी आईसोबत मुंबई गाठली. जगदीप यांच्या आईने अनाथआश्रमात जेवण बनवत खूप कष्ट करत मुलांना मोठं केलं.3 / 7जगदीप यांच्या लग्नाचा किस्सा अजबच आहे. त्यांनी तीन लग्न केले. तीन लग्नातून त्यांना ६ मुलं झाली. जगदीप यांच्या तिसऱ्या लग्नाचा किस्सा हैराण करणारा आहे. त्यांची तिसरी पत्नी ही ३३ वर्ष छोटी होती. काय आहे तो किस्सा बघुया4 / 7जगदीप यांचं तिसरं लग्न कायम विवादात राहिलं. त्यांचा दुसरा मुलगा नावेदला बघायला मुलीचं कुटुंब आलं होतं. मात्र त्यावेळी नावेदने लग्नाला नकार दिला होता. त्याला करिअर बनवायचं होतं. जी मुलगी नावेदला बघायला आली होती त्या मुलीच्या मोठ्या बहिणीच्या जगदीप प्रेमात पडले. त्यांनी तिला प्रपोज केलं. मुलगीही हो म्हणाली आणि त्यांचं लग्न झालं.5 / 7जगदीप यांच्या या तिसऱ्या पत्नीचं नाव होतं नाजिमा. नाजिमा जगदीप यांच्यापेक्षा तब्बल ३३ वर्ष लहान होती. जगदीप यांचा मुलगा आणि अभिनेता जावेद जाफरी मात्र या लग्नामुळे नाराज झाला होता. नाजिमा आणि जयदीपची यांची मुलगीही आहे जी जावेद जाफरीचा मुलगा मिजानहून ६ महिने छोटी आहे. 6 / 7जगदीप यांनी फिल्म इंड्स्ट्रीत स्वत:चं नाव कमावलं होतं. त्यांनी स्वत:ला जॉनी वॉकर पासून महमूद सारख्या दिग्गज कलाकारांच्या यादीत आणून ठेवलं होतं. 7 / 7८ जुलै २०२० रोजी वयाच्या ८१ व्या वर्षी जगदीप यांचं निधन झालं. त्यांचा अभिनय आजही चाहत्यांच्या मनात घर करुन आहे. जगदीप हे एकमेव असे अभिनेते होते ज्यांनी बालकलाकार म्हणून काम करायला सुरुवात केली आणि ते मरेपर्यंत काम करत राहिले. त्यांनी कधीच अभिनयातून ब्रेक घेतला नाही. आणखी वाचा Subscribe to Notifications