PHOTOS: 'लक्ष्मी बॉम्ब'चा दमदार ट्रेलर झाला रिलीज, घाबरवण्याऐवजी हसविताना दिसला अक्षय कुमार
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 9, 2020 17:27 IST
1 / 8अक्षय कुमारचा आगामी चित्रपट लक्ष्मी बॉम्बची चाहते उत्सुकतेने वाट पाहत आहेत.2 / 8चाहत्यांची प्रतीक्षा आता संपली आहे. अक्षय कुमारच्या लक्ष्मी बॉम्बचा ट्रेलर रिलीज झाला आहे.3 / 8चाहते लक्ष्मी बॉम्ब चित्रपटाची उत्सुकतेने वाट पाहत आहेत. या चित्रपटात अक्षय हटके अंदाजात दिसणार आहे.4 / 8अक्षय कुमारने चित्रपटाचा ट्रेलर शेअर करत लिहिले की, लक्ष्मी बॉम्बचा ऑफिशिएल ट्रेलर, जिथे कुठे असाल तिथे थांबा आणि तयार व्हा लक्ष्मी बॉम्बचा ट्रेलर पाहण्यासाठी. कारण बरसण्यासाठी येत आहे लक्ष्मी. ट्रेलर हॉरर आणि कॉमेडीने परीपूर्ण आहे.5 / 8ट्रेलरवरून चित्रपटाच्या कथेचा अंदाज लावू शकतो की चित्रपटात अक्षय कुमार अशा व्यक्तीच्या भूमिकेत आहे जो भूत-प्रेताला खूप घाबरतो. मात्र नंतर असे काही होते की ट्रान्सजेंडरची आत्मा त्याच्या शरीरात प्रवेश करते.6 / 8ट्रेलरमध्ये अक्षय कुमारचा एक डायलॉग आहे ज्या दिवशी माझ्यासमोर भूत येईल तेव्हा मी बांगड्या घालेन, पण नंतर त्याच्या हातात बांगड्या पहायला मिळतात.7 / 8मुलींसारखे चालणे बोलणे खूप इंप्रेसिव्ह वाटते. हा चित्रपट फॅमिली ड्रामा आहे ज्यात अक्षय कुमार आपली गर्लफ्रेंड कियारा आडवाणीसोबत तिच्या पालकांसोबत राहत असतो. याच घरात भूत असल्याचे भासू लागते.8 / 8ट्रेलरमध्ये साडीमध्ये अक्षय कुमारचे खूप चांगले सीन आहेत.