IN PICS : विजय देवरकोंडाने 11 वर्षात फक्त 4 ब्लॉकबस्टर सिनेमे दिलेत, ‘फ्लॉप’चा आकडा वाचून धक्का बसेल!! By ऑनलाइन लोकमत | Published: August 28, 2022 4:40 PM1 / 12साऊथ सुपरस्टार विजय देवरकोंडा सध्या ‘लाइगर’ या सिनेमामुळे चर्चेत आहेत. या चित्रपटाद्वारे विजयने बॉलिवूड डेब्यू केला. अर्थात त्याचा हा डेब्यू फसला.2 / 12‘लाइगर’ हा विजयचा सिनेमा फ्लॉपच्या रांगेत बसला आहे. तीनच दिवसांत हा चित्रपट सपशेल आपटला आहे. अर्थात हा काही विजय देवरकोंडाचा पहिला फ्लॉप सिनेमा नाही.3 / 12‘लाइगर’ हा विजयच्या 11 वर्षांच्या करिअरमधील 17 वा सिनेमा आहे. त्याआधी 11 वर्षांच्या करिअरमध्ये त्याने 16 सिनेमे केलेत. पैकी फक्त 4 सिनेमे ब्लॉकबस्टर ठरलेत. 4 / 122011 मध्ये विजयने ‘नुव्वीला’ या चित्रपटातून करिअरची सुरूवात केली होती. त्याच्या या पहिल्या सिनेमाने ठीक ठिक कमाई केली होती.5 / 12पुढच्याच वर्षी ‘लाइफ इज ब्यूटिफुल’ हा त्याचा सिनेमा रिलीज झाला. हा सिनेमाही बॉक्स ऑफिसवर फार काही कमाल दाखवू शकला नव्हता.6 / 122016 मध्ये विजय देवरकोंडा ‘येवडे सुब्रमण्यम’ या चित्रपटात झळकला. त्याच्या या सिनेमाला पहिल्या दोनपेक्षा चांगलं यश मिळालं. हा सिनेमा हिट झाला.7 / 122016 साली विजयने ‘पेली चोपुलु’ या चित्रपटातून पहिल्यांदा लीड रोलमध्ये डेब्यू केला. हा चित्रपट मात्र ब्लॉकबस्टर ठरला. 1 कोटी बजेटमध्ये बनलेल्या या सिनेमानं सुमारे 30 कोटी कमावले होते.8 / 122017 साली विजयचे दोन सिनेमे रिलीज झालेत. यापैकी एक द्वारका नावाचा सिनेमा सुपरडुपर फ्लॉप ठरला आणि दुसरा ‘अर्जुन रेड्डी’ सुपरडुपर हिट.9 / 12‘अर्जुन रेड्डी’ या सिनेमाने विजय देवरकोंडाला खरी ओळख दिली. 5 कोटी बजेटच्या या सिनेमाने तेव्हा 50 कोटींचा बिझनेस केला होता. त्याच्या या चित्रपटाचा ‘कबीर सिंग’ हा हिंदी रिमेक बनवला गेला.10 / 122018 साली विजयने 6 सिनेमे केलेत. यापैकी महानटी, गीता गोविंदम ब्लॉकबस्टर तर टॅक्सीवाला हिट ठरला होता. त्याचे उर्वरित तीन सिनेमे दणकून आपटले होते.11 / 122019 मध्ये विजय देवरकोंडा ‘डिअर कॉम्रेड’ या सिनेमात दिसला. या सिनेमातील त्याची व रश्मिका मंदानाची जोडी लोकांना भलतीच भावली. हा सिनेमा बॉक्स ऑफिसवर फार चालला नाही. पण याचं हिंदी डब व्हर्जन टीव्हीवर आलं तेव्हा लोकांनी हा सिनेमा डोक्यापर घेतला.12 / 122020 मध्ये विजय ‘वर्ल्ड फेमस लव्हर’मध्ये दिसला. हा सिनेमा फ्लॉप ठरला. 2021 मध्ये आलेला त्याचा ‘जथि रत्नालु’ मात्र ब्लॉकबस्टर ठरला. आणखी वाचा Subscribe to Notifications