Join us

बॉलिवूडच्या प्रसिद्ध अभिनेत्रीनं कॅन्सरशी लढाई जिंकलेली, पण....

By ऑनलाइन लोकमत | Published: November 09, 2022 4:58 PM

1 / 11
चित्रपट आणि टीव्ही इंडस्ट्रीमध्ये असे अनेक लोक झाले आहेत, ज्यांनी वेगवेगळ्या आजारांशी लढाई जिंकली आहे. कॅन्सरसारख्या भयंकर आजाराशी लढा देऊन त्यावर मात केलेल्या अनेक अभिनेत्री आहेत. (फोटो इन्स्टाग्राम)
2 / 11
त्यापैकी एक अभिनेत्री लिसा रे. तिचे वर्कआउटचे व्हिडिओ सोशल मीडियावर अनेकदा पाहायला मिळतात. 2009 मध्ये, लिसा रेला बोन मॅरो(Bone Marrow) कॅन्सरचे निदान झाले.(फोटो इन्स्टाग्राम)
3 / 11
तिला स्वत:च्या पायावर नीट उभं राहणंही कठीण झालं होतं. नंतर, स्टेम सेल ट्रान्सप्लांटच्या मदतीने, लिसा रेचा कॅन्सर बरा झाला. 'कसूर' फेम अभिनेत्री लिसा रेला दोन मुली आहेत. अभिनेत्रीने 2012 मध्ये लग्न केले. (फोटो इन्स्टाग्राम)
4 / 11
कॅन्सरनंतर तिच्या आयुष्यात अनेक बदल सुरु झालं. अलीकडेच, कॅन्सरबाबत लिसा रेने सांगितल की, कॅन्सर इतक्या प्रमाणात वाढला, की तिच्या शरीरात रेड ब्लड सेल्स काउंट कमी होऊ लागला. (फोटो इन्स्टाग्राम)
5 / 11
डॉक्टर हे पाहून हैराणा झाले होते की, ती आपल्या पायावर कशी उभी राहिली आहे. (फोटो इन्स्टाग्राम)
6 / 11
ली जारेने तिला आलेला अनुभव शेअर करताना सांगितल की, माझ्या शरीरात रेड ब्लड सेल काउंट इतका कमी झाला, की मला कधीही कार्डियक अरेस्ट येऊ शकत होता असं डॉक्टरांचं म्हणणं होतं. (फोटो इन्स्टाग्राम)
7 / 11
त्या वेळी सांगावे लागले. डॉक्टरांनी माझ्या ब्लड टेस्टचे रिपोर्ट पहिले. अनेक महिन्यांपासून मला थकवा जाणवत होता, पण मी लक्ष दिले नव्हते किंवा मला असे काही होईल असे वाटले नव्हते. (फोटो इन्स्टाग्राम)
8 / 11
काही ब्लड डेस्ट केल्यावर डॉक्टरांनी मला बोन मॅरो कॅन्सर झाल्याचे सांगितले. पहिल्यांदाच माझं आयुष्य थांबलं असल्याची भावना निर्माण झाल्याचं ती म्हणाली. (फोटो इन्स्टाग्राम)
9 / 11
लिसा रे म्हणाली, 'मला नेहमीच पुस्तक लिहायचे होते. मला वाटले की मी स्वत: त्याच्याशी कनेक्ट होऊ शकेन. पण कामामुळे मला लिहिता आले नाही. कॅन्सर माझे संपूर्ण आयुष्यच बदलून टाकले. जेव्हा माझी स्टेम सेल शस्त्रक्रिया झाली तेव्हा मी मृत्यू जवळून पाहिला.(फोटो इन्स्टाग्राम)
10 / 11
कॅन्सरवरील किमोथेरेपीनंतर लिसाने पुन्हा काम करण्यास सुरुवात केली. ती एका ट्रॅव्हल शोचा भाग होती. त्यावेळी तिचे केस अतिशय लहान होते. लहान केसांमुळे तिला रिप्लेस करण्यात आलं होतं, कारण शोमध्ये लांब केस असणारी मुलगी हवी होती. (फोटो इन्स्टाग्राम)
11 / 11
लहान केसांमुळे रिप्लेस होणं, हे अतिशय दु:खद असल्याचं तिने सांगितलं. या कॅन्सरला आता ९ वर्ष झाली असून आता मी पुन्हा नवं आयुष्य जगत असल्याचं ती म्हणाली.(फोटो इन्स्टाग्राम)
टॅग्स :लिजा रेकर्करोगसेलिब्रिटी