कंगना रणौत ते अमोल कोल्हे, पडद्यावरच्या ग्लॅमरस चेहऱ्यांना लोकसभा निवडणुकीतही पसंती! By ऑनलाइन लोकमत | Published: June 05, 2024 2:51 PM1 / 9Loksabha Election Result 2024 : ४ जूनला लोकसभा निवडणुकीचा निकाल लागला. यंदाच्या निवडणुकीत अनेक सेलिब्रिटींनाही राजकीय पक्षांकडून तिकीट मिळालं होतं. 2 / 9पडद्यावरच्या ग्लॅमरस चेहऱ्यांना लोकसभा निवडणुकीतही लोकांनी पसंती दिल्याचं चित्र आहे. कंगना रणौत ते अमोल कोल्हे या सेलिब्रिटींचं नाणं खणखणीत वाजलं. 3 / 9बॉलिवूडची क्वीन कंगना रणौतने हिमाचल प्रदेशातील मंडी येथून भाजपाच्या तिकिटावर निवडणुक लढवली होती. कंगनाला एकूण ५ लाख ३७ हजार २२ मतं मिळाली. या निवडणुकीत तिने ७४ हजारांचं मताधिक्य ठेवत विजय मिळवला. 4 / 9मराठमोळा अभिनेता असलेले अमोल कोल्हे राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरद पवार गटाकडून शिरूरमधून उभे राहिले होते. अजित पवार गटाच्या आढळराव पाटील यांचा १ लाख ४० हजार ९५१ मतांनी पराभव करत अमोल कोल्हे सलग दुसऱ्यांदा खासदार झाले आहेत. 5 / 9बॉलिवूडची ड्रीम गर्ल हेमा मालिनी यांनी उत्तर प्रदेशातील मथुरा येथून भाजपाच्या तिकिटावर निवडणूक लढवली. २ लाख ९३ हजार ४०७ मताधिक्य राखत सलग तिसऱ्यांदा त्या खासदार झाल्या आहेत. 6 / 9बॉलिवूडमधील दिग्गज अभिनेता शत्रुघ्न सिन्हाही तिसऱ्यांदा खासदार झाले आहेत. या निवडणुकीत त्यांना ६ लाख ५ हजार ६४५ मतं मिळाली. त्यांनी तृणमूल काँग्रेसच्या तिकिटावर निवडणुक लढवली होती. 7 / 9अभिनेता रवी किशन यांनी भाजपाच्या तिकिटावर निवडणुक लढवत उत्तर प्रदेशातील गोरखपूर येथून विजय मिळवला. १ लाख ३ हजार ५२६ मताधिक्य राखत एकूण ५ लाख ८५ हजार ८३४ मत मिळवत ते विजयी झाले. 8 / 9भाजपाच्या तिकिटावर भोजपुरी अभिनेता मनोज तिवारींनी दिल्लीत निवडणुक लढवली होती. ८ लाख २४ हजार ४५१ मतं मिळवत त्यांनी काँग्रेसच्या कन्हैया कुमारचा पराभव केला. 9 / 9टीव्हीवरच्या रामानेही यंदाच्या लोकसभा निवडणुकीत लोकांची मनं जिंकली आहेत. भाजपच्या तिकीटावर मेरठमधून निवडणूक लढवत त्यांनी विजय मिळवला. आणखी वाचा Subscribe to Notifications