विवाहीत असूनही वयाने २० वर्ष लहान असलेल्या अभिनेत्रीच्या प्रेमात पडले होते नाना पाटेकर, एका कारणामुळे झाले दोघांचे ब्रेकअप By ऑनलाइन लोकमत | Published: May 19, 2021 3:42 PM1 / 10नाना पाटेकर आणि मनीषा कोईराला यांनी ‘अग्निसाक्षी’ सिनेमात एकत्र काम केले होते. सिनेमात काम करता करता दोघांमध्ये जवळीक वाढु लागली.दोघांचीही मैत्रीचे रूपांतर प्रेमात कधी झाले हे दोघांनाही कळले नाही. 2 / 10नाना-मनिषा यांच्या अफेअरमुळे अग्निसाक्षी सिनेमाही हिट ठरला. दोघांची ऑनस्क्रीन जोडी रसिकांच्याही प्रचंड पसंतीस पडली होती. या सिनेमानंतर दोघांची जोडीही हिट ठरली. दोघांनाही अनेक सिनेमाच्या ऑफर यायला लागल्या.3 / 10नानांसाठी मनिषा फारच पझेसिव होती. नानांचे त्यांच्या कोस्टार सोबत जास्त मिळून मिसळून वागणे मनिषाला अजिबात आवडायचे नाही. मनिषा कोईरालाचे नाना यांच्याशी इतर अभिनेत्रींवरुन नेहमी खटके उडायचे.4 / 10मनिषा प्रमाणे नानाही खूप पझेसिव्ह होते.सिनेमाच्या शूटिंगसाठी मनीषाचे तोकडे कपडे घालणे नाना यांना अजिबात पसंत नव्हते. असे कपडे घालायला नाना मनिषाला नाना नेहमीच नकार द्यायचे.5 / 10मनिषा कोईराला दोघांच्या या नात्याला घेवून खूप सीरियस होती.दोघेही प्रेमात आकंठ बुडाले होते. मनिषाला त्यांच्याशी लग्न करायचे होते. अनेकदा मनिषाने नाना पाटेकर यांना ही गोष्ट सांगितली,मात्र नाना यांनी या गोष्टीकडे नेहमी दुर्लक्ष केले.6 / 10दोघांचेही अफेअर सुरू असताना नाना पाटेकर विवाहीत होते. नीलाकांती पाटेकर यांच्यासोबत नानाचे वैवाहिक जीवन सुरळीत नसल्याच्याही चर्चा रंगल्या. लग्न झाले असतानाही दोघेही वेगवेगळे राहायचे. 7 / 10मनिषाने नाना यांच्यावर पत्नीला घटस्फोट देऊन लग्न करण्यासाठी दबाव दिला पण नाना काहीही करुन पत्नीला घटस्फोट देण्यासाठी तयार नव्हते. मनिषाला नाना यांच्या अशा वागण्याचा संताप येत होता. 8 / 10एक दिवस असा आला जेव्हा नाना आणि मनिषा यांच्यात कायमचा दुरावा निर्माण झाला. नाना यांना मनिषाने एका रुममध्ये अभिनेत्री आयेशा झुल्कासोबत रंगेहात पकडले होते. दोघांना एकत्र पाहून मनिषा फार दुखावली गेली होती.9 / 10आयेशा आणि नाना दोघांनाही एकत्र पाहून मनिषा फार संतापली. दोघांना पाहून मनीषाने प्रचंड गोंधळ घातला. नाना पाटेकर यांनी मनिषाला कसेबसे शांत केले. अखेर नानाच्या या वागणुकीमुळे हैरान होवून मनिषाने नानापासून ब्रेक करत दूर जाणेच पसंत केले. 10 / 10मनिषा कोईरालासोबत ब्रेकअप झाल्यानंतर नाना आयेशा झुल्काच्या प्रेमात पडले. दोघांनीही लिव-इन मध्ये राहण्यास सुरुवात केली होती पण नानाच्या तापट स्वभावामुळे आयेशा आणि नाना यांचे नातेही फार काळ काही टिकले नाही. आणखी वाचा Subscribe to Notifications