आधी मैत्री मग प्रेम आणि लग्न! फुल्ल टू फिल्मी आहे केएल राहुल आणि अथिया शेट्टीची लव्हस्टोरी By ऑनलाइन लोकमत | Published: November 05, 2023 1:57 PM1 / 10अथिया शेट्टी आज आपला 31 वा वाढदिवस साजरा करत आहे. फिल्मी जगतात अथिया फारशी यश मिळवू शकली नाही. पण प्रेमात मात्र ती जिंकली. 2 / 10अभिनेता सुनील शेट्टीची मुलगी अथिया आणि क्रिकेटर केएल राहुल यांनी काही वर्ष एकमेंकाना डेट केल्यानंतर दोघांनी लग्नाचा निर्णय घेतला होता.3 / 10अथियाने भारताचा स्टार क्रिकेटर के.एल राहुलशी 23 जानेवारी 2023 रोजी कुटुंबियांच्या उपस्थितीमध्ये लग्न केलं. 4 / 10 या दोघांचे लग्न सुनील शेट्टी यांच्या खंडाळा येथील फार्म हाऊसवर झाले होते. 5 / 10अभिनेता केएल राहुल आणि अथियाची ओळख त्यांच्या कॉमन फ्रेंडच्यामध्यमातून झाली होती, असे म्हटले जाते.6 / 10त्यानंतर दोघांची मैत्री सुरू झाली आणि नंतर या मैत्रीचं रुपांतर प्रेमात झालं. केएल राहुल आणि अथिया शेट्टी यांना सुरुवातीला त्यांचे नाते मीडिया आणि लाइमलाइटपासून दूर ठेवण्याचा प्रयत्न केला. 7 / 10 रिलेशनशिपमध्ये असूनही, दोघेही जवळपास दीड वर्ष एकमेकांसोबत कधीही दिसले नाहीत, दोघांनी कधीही एकत्र फोटो सोशल मीडियावर पोस्ट केले नाहीत.8 / 102021 मध्ये अथियाच्या वाढदिवसाला त्यांच्या नात्याचा अधिकृत खुलासा झाला होता. केएल राहुलने अथिया शेट्टीसोबतचे फोटो शेअर करत 'हॅपी बर्थडे माय लव्ह' असं लिहित पोस्ट केली होती.9 / 10 यानंतर अथिया आणि केएल राहुल अनेकदा एकत्र वेळ घालवताना दिसले. कधी अथिया मॅच पाहण्यासाठी स्टेडियममध्ये पोहोचली तर कधी सुट्टीत दोघेही एकमेकांसोबत स्पॉट झाले.10 / 10लग्नानंतर अथिया शेट्टी आणि केएल हे नेहमीच कपल गोल्स देताना दिसतात. आणखी वाचा Subscribe to Notifications