Join us

बायोपिकसाठी धोनीने किती कोटी घेतले होते माहितीये? संजूबाबा, सायनाचा ‘भाव’ ही जाणून घ्या

By ऑनलाइन लोकमत | Published: May 21, 2021 9:25 PM

1 / 10
महेंद्र्र सिंह धोनीच्या आयुष्यावर आधारित ‘एमएस धोनी: द अन्टोल्ड स्टोरी’ या चित्रपटात दिवंगत अभिनेता सुशांत सिंह राजपूतने मुख्य भूमिका साकारली होती. या चित्रपटाने ब्लॉकबस्टर कमाई केली. या सिनेमासाठी धोनीने किती रूपये घेतले होते, माहितीये? तर तब्बल 45 कोटी. काही रिपोर्टमध्ये हा आकडा 60 कोटी असल्याचेही सांगितले आहे.
2 / 10
‘फ्लाइंग सिख’ म्हणून लोकप्रिय असलेले एथलीट मिल्खा सिंह यांनी यांच्या आयुष्यावरचा ‘भाग मिल्खा भाग’ हा सिनेमाही गाजला. मात्र या सिनेमासाठी मिल्खा सिंह एक पैसाही घ्यायला तयार नव्हते. अखेर निर्मात्यांनी खूप विनंती केल्यावर त्यांनी केवळ 1 रूपया घेतला होता.
3 / 10
महावीर फोगाट यांच्या आयुष्यावर आधारित ‘दंगल’ चित्रपटात अभिनेता आमीर खानने साकालेली भूमिका गाजली, तेवढाच हा सिनेमाही गाजला. आपल्या बायोपिकसाठी महावीर यांनी 80 लाख रूपये घेतले होते.
4 / 10
दीपिका पादुकोणचा ‘छपाक’ चित्रपट एका अ‍ॅसिड हल्ल्यातील पीडिता लक्ष्मी अग्रवालच्या आयुष्यावर बेतलेला होता. आपल्या आयुष्यावर चित्रपट बनवण्यासाठी लक्ष्मीने 13 लाख रुपये घेतले होते.
5 / 10
संजय दत्तच्या आयुष्यावरचा ‘संजू’ हा सिनेमा सुपरडुपर हिट ठरला. या सिनेमासाठी संजयने 9 ते 10 कोटी घेतले होते़ इतकेच नाही तर सिनेमाच्या कमाईमधील काही भाग संजय यांना देण्यात आला होता.
6 / 10
सायना नेहवालने तिच्या आयुष्यावरच्या ‘सायना’ या बायोपिकसाठी 50 लाख रूपये घेतल्याचे कळते. परिणीती चोप्राने या बायोपिकमध्ये मुख्य भूमिका साकारली आहे.
7 / 10
भारतीय महिला क्रिकेटपटू मिताली राज हिच्या आयुष्यावरचा सिनेमा लवकरच आपल्या भेटीला येणार आहे. तापसी पन्नू यात मुख्य भूमिकेत दिसणार आहे. या सिनेमासाठी मितालीने 1 कोटी घेतल्याची चर्चा आहे.
8 / 10
‘83’ हा सिनेमा कपिल देव आणि त्यांच्या टीमने जिंकलेल्या पहिल्या विश्वचषकाची विजयगाथा सांगणारा सिनेमा. या सिनेमात रणवीर सिंग कपिल देव यांची भूमिका साकारताना दिसणार आहे. या सिनेमासाठी कपिल देव यांनी 20 कोटी चार्ज केल्याचे कळते.
9 / 10
सचिन- अ बिलिअन ड्रिम्स या सचिन तेंडूलकर याच्या आयुष्यावर आधारित सिनेमा 2017 साली रिलीज झाला होता. या सिनेमासाठी सचिनने 40 कोटी घेतल्याचे कळते.
10 / 10
पीव्ही सिंधू ही दिग्गज बॅडमिंटनपटू हिच्या आयुष्यावरचा सिनेमाही येत्या काळात पडद्यावर दिसणार आहे. या सिनेमात दीपिका पादुकोण लीडरोलमध्ये दिसणार असल्याची चर्चा आहे. या सिनेमासाठी पी़ व्ही़ सिंधूने 1 कोटी घेतल्याचे कळते.
टॅग्स :आत्मचरित्रबॉलिवूडएम. एस. धोनी