Join us  

"चेहऱ्यात 67 काचेचे तुकडे घुसले, लपवून ठेवला अपघात", अभिनेत्रीने सांगितली भीषण आठवण!

By ऑनलाइन लोकमत | Published: October 02, 2024 1:43 PM

1 / 10
१९९७ साली 'परदेस' चित्रपट आला होता. या चित्रपटाने जगभरात कमाई केली होती. या चित्रपटातील 'दो दिल मिल रहें है', 'मेरी महबुबा' आणि 'दिल दिवाना...' ही आजही लोकांची आवडती आहेत.. पण, या चित्रपटातील खास गोष्ट म्हणजे सिनेमात 'गंगा' ही भूमिका निभावणारी सौंदर्यवती महिमा चौधरी.
2 / 10
'परदेस' चित्रपटात गंगा ही भूमिका निभावणाऱ्या महिमा चौधरीला विसरणे सहजासहजी शक्य नाही. सुभाष घई दिग्दर्शित 'परदेस' सिनेमात किंग खान शाहरुख आणि महिमाच्या जोडीला प्रेक्षकांनी भरभरुन प्रेम दिलं होतं.
3 / 10
'परदेस' हा महिमाचा पहिलाच चित्रपट होता. सुभाष घई यांनी तिला आपल्या चित्रपटातून ब्रेक दिला होता. महिमाने पहिल्याच चित्रपटातून आपल्या दमदार अभिनयकौशल्याची चुणूक दाखवली होती.
4 / 10
करिअरचा आलेख चढत असतानाच महिमा चौधरीच्या आयुष्यात मोठं वादळं आलं. 1999 मध्ये 'दिल क्या करे' या चित्रपटाच्या शूटिंगदरम्यान बंगळूरूमध्ये तिचा भीषण अपघात झाला होता.
5 / 10
प्रत्येक अभिनेत्रीसाठी तिचा चेहरा हा फार महत्त्वाचा असतो. त्यावर एकही डाग पडू नये, यासाठी त्यांची धडपड असते. चेहऱ्याची काळजी घेतली जाते. पण, या भीषण अपघातमध्ये कारच्या काचा फुटून महिमाच्या चेहऱ्यात घुसल्या होत्या. तिच्या चेहऱ्यावरून डॉक्टरांनी तब्बल 67 काचेचे तुकडे काढले होते.
6 / 10
नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत महिमाने त्या अपघाताच्या कटू आठवणी सांगितल्या आहेत. या अपघातानंतर आपण पुन्हा फिल्म इंडस्ट्रीत काम करू शकणार नाही, असं महिमाला वाटलं होतं.
7 / 10
जेव्हा हा अपघात झाला तेव्हा तिच्याकडे अनेक मोठे चित्रपट होते. पण, ही बातमी बाहेर आल्यास करिअर धोक्यात येईल, या भीतीने महिमाने अपघाताची बातमी लपवून ठेवण्याची विनंती अजय देवगण आणि प्रकाश झा यांना केली होती. महिमा म्हणाली, 'हीच घटना आताच्या घडीला घडली असती तर अनेकांनी पाठिंबा दर्शविला असता, पण त्याकाळी इंडस्ट्रीत तेवढे मोकळे विचार कोणीच करत नव्हतं'.
8 / 10
अपघातानंतर एका मॅगझिन फोटोग्राफरने महिमाचा गुपचूप फोटो क्लिक करून तो प्रकाशित केला होता. त्यात 'डाग असलेला चेहरा' असा उल्लेख करण्यात आला होता, अशा शब्दांत महिमाने दु:ख व्यक्त केलं. या अपघाताने ती पूर्ण खचली. तरी तिने धीर सोडला नाही. या आघातातून सावरायला तिला खूप वेळ लागला. अपघातानंतर अजय देवगणने महिमाची साथ सोडली नाही. अजयने तिला त्याच्या एका चित्रपटात कामंही दिलं. मात्र तो प्रयोग फारसा यशस्वी झाला नाही.
9 / 10
महिमाने आयुष्यात अनेक संकटांचा सामना केलाय. २०२२ मध्ये अभिनेत्रीला कर्करोगाचं निदान झालं होतं. त्यावरही तिने मात केली. लव्ह लाईफबद्दल बोलायचं झालं तर महिमा टेनिसपटू लिएंडर पेसला डेट केलं. त्यानंतर २००३ मध्ये लिएंडर पेस मॉडेल रिया पिल्लई हिच्या प्रेमात पडला. यानंतर २००६ मध्ये बॉबी मुखर्जीसोबत विवाह केल्यानंतर महिमा चौधरीने २००७ मध्ये एका मुलीला जन्म दिला. तिचं नाव आर्यना असं आहे. मात्र तिच्या जन्मानंतर काही काळातच महिमा आणि तिच्या पतीमध्ये मतभेद झाले. अखेरीस २०१३ मध्ये दोघेही वेगळे झाले होते. आता महिमा चौधरी सिंगल मदर म्हणून जीवन जगत आहे.
10 / 10
आता महिमा चौधरी कंगना राणौतच्या 'इमर्जन्सी' या चित्रपटातून इंडस्ट्रीत कमबॅक करते आहे. या चित्रपटात ती लेखिका 'पुपुल जयकर' यांच्या भूमिकेत दिसत आहे.
टॅग्स :महिमा चौधरीअजय देवगणसेलिब्रिटीबॉलिवूड