Arbaaz Khan Malaika Arora : बाेल्ड कपड्यांमुळे झाला मलायकाचा घटस्फोट? अखेर अरबाजने सांगितलं सत्य By ऑनलाइन लोकमत | Published: January 12, 2023 3:53 PM1 / 11बॉलिवूड स्टार मलायका अरोरा तिच्या फॅशन सेन्स आणि बोल्डनेसमुळे कायम चर्चेत असते. तिच्या पर्सनल लाईफचीही चर्चा होते.2 / 11मलायका सध्या अर्जुन कपूरला डेट करतेय. त्याआधी मलायका अरबाज खानची पत्नी होती. मात्र २०१७ मध्ये दोघांचा घटस्फोट झाला.3 / 11सुमारे १९ वर्षे अरबाज व मलायका एकत्र नांदले आणि अखेर एकमेकांपासून वेगळे झालेत. या घटस्फोटाची तेव्हा बरीच चर्चा झाली होती, आजही होते.4 / 11मला पुढच्या जन्मातही खान कुटुंबाची सून व्हायला आवडेल, असं कधीकाळी मलायका म्हणाली होती. पण याच जन्मात तिचं अरबाजसोबत बिनसलं.5 / 11अरबाज व मलायकाचं अचानक काय बिनसलं, दाेघांचा घटस्फोट का झाला, हे कळायला मार्ग नाही. पण बऱ्याचदा मलायकाच्या कपड्यांमुळे हा घटस्फोट झाल्याचंही म्हटलं गेलं. 6 / 11आता इतक्या वर्षानंतर अरबाजने याबद्दल खुलासा केला आहे. खरंच मलायकाच्या बोल्ड कपड्यांमुळे दोघांचं नातं घटस्फोटापर्यंत येऊन पोहोचलं का, यावर तो बोलला.7 / 11मलायकाच्या कपड्यांवर तू कधी आक्षेप घेतला होता का? असा प्रश्न अलीकडे एका मुलाखतीत अरबाज खान विचारण्यात आला. यावर त्याने नकारार्थी उत्तर दिलं.8 / 11 “मी मलायकाला तिच्या कपड्यांबद्दल कधीच बंधनं लादली नाहीत. मी तिच्या कपड्यांचे नेहमीच समर्थन करायचो”, असं तो म्हणाला.9 / 11“एखाद्याला एखाद्या गोष्टीसाठी थांबवलं तर तो तिच गोष्टी जास्त करतो, हे मला माहित आहे. त्यामुळे मलायकाच्या फॅशन स्टाइलबद्दल मी कधीच काही बोललो नाही”, असंही त्याने स्पष्ट केलं.10 / 11मलायका व अरबाजचा घटस्फोट नेमका कुठल्या कारणाने झाला, हे अद्याप समोर आलेलं नाही. दोघंही कधीच यावर बोलले नाहीत.11 / 11पण दोघांमध्ये मतभिन्नता होती, असं त्यांचं म्हणणं होतं आणि त्यामुळेच दोघेही वेगळे झाले. आता दोघंही आपआपल्या आयुष्यात आनंदी आहेत. आणखी वाचा Subscribe to Notifications